Press "Enter" to skip to content

साजगाव येथे केमिकल कंपनीत प्रचंड स्फोट, एका महिलेचा मृत्यू

तीन कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी : आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असताना पुन्हा स्फोट 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । गुरुनाथ साठीलकर 🔶🔷🔶

खालापूर जवळील साजगाव हद्दीतील
आरकोस इंडस्ट्रीयल इस्टेट मधील
जसनव्हा केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन आज भल्या पहाटे प्रचंड मोठी आग लागली. या आगीत शेजारीच राहत असलेल्या कुटूंबातील एक महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. आगीच्या चपाट्यात शेजारी असलेल्या एस एस पेपर ट्यूब, पेन ट्यूब या कंपन्या देखील आल्याने आगीने आणखीनचं रौद्र रूप धारण केले.

घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अमोल वलसंग,किसवे,जि.प.सदस्य नरेश पाटील,सरपंच अजित देशमुख, सदस्य अजित देशमुख, आपघातग्रस्तचे गुरू साठिलकर पोहचले आणि मदतकार्य सुरू केले.पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार, निरीक्षक धनाजी क्षीरसागर, साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, श्रीरंग किसवे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

स्फोट झालेल्या कंपनीच्या बाजूला असलेल्या कंपनीला आगीचा वेढा पडला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

खोपोली नगरपरिषद, टाटा स्टील भुषण, उत्तम स्टील, HPCL (2), रिलायन्स (2), कर्जत नगरपरिषद अश्या 8 फायर ब्रिगेड पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

त्या ठिकाणी स्फोटांची मालिका सुरूच !

फायर ब्रिगेडचे आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच 6.30 च्या दरम्यान पुन्हा स्फोट झाला. DYSP संजय शुक्ला, PI धनाजी क्षीरसागर, पोलीस अधिकारी अमोल वळसंग, सतीश आसावर, श्रीरंग किसवे, रिलायन्स कंपनीचे शाम साळवी, आरकोसचे अशपाक लोगडे, अनिल खलापुरकर आणि अपघातची टीम त्या ठिकाणी काम करत असताना हा स्फोट झाला. सुदैवाने सगळे सुखरूप आहेत.

अजूनही अग्निशमन दलाचे बंब ठीकठिकानाहून दाखल होत आहेत.

संबधित केमिकल कंपनीची शेड भुई सपाट झाली असून आजूबाजूच्या 3 ते चार कंपन्या बाधित झालेल्या आहेत.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या टीमची मदत घेतली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.