Press "Enter" to skip to content

नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर हलविण्याची मागणी

भाजप नेते राजेश गायकर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

सिटी बेल लाइव्ह / कामोठे #

नागरी वस्त्यांमधील कोविड सेंटर आयसोलेटेड एरियात हलविण्यात यावेत अशी मागणी राजेश नारायण गायकर, सरचिटणीस पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष, ओ.बी.सी. मोर्चा , रायगड यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजेश गायकर यांनी दिलेल्या निवदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना आपण ठिक ठिकाणी कोरोना सेंटर उभे करित आहात.असे कोविड सेंटर नागरी वस्त्यांमधून सुरू करणे वा त्यासाठी नागरी वस्त्यांमधील हॉस्पिटलची मागणी करणे संपूर्णपणे चुकीचे आहे.पालिकेस आजमितीस अनेक ठिकाणे व जागा उपलब्ध आहेत.दुसरीकडे सिडको अशी सुसज्ज कोविड सेंटर वाशी,मुंबई, ठाणे या ठिकाणी उभे करून दिले/देत आहेत.असे असतानाही आपण अशा जागांचा वापर न करता वा सिडकोकडे कोविड सेंटरची मागणी न करता नागरी वस्त्यांमध्ये कोविड सेंटर व हॉस्पिटल चालवित आहात,हे अतिशय दुर्दैवी व दुर्भाग्यपूर्ण आहे महोदय आपल्याला माहित आहे कि पनवेलमध्ये अनेक,खेळांची मैदाने वा स्टेशन समोरील पार्किंग असतील वा शासनाच्या एफएसायच्या नेक्सऑन वा बालाजी सिंफनी या इमारती आज बंद अवस्थेत आहेत असे सर्व जागा उपलब्ध असतानाही आपण विनाकारण नागरी वस्त्यांमध्ये कोविड सेंटर उभारत/प्रयत्नात आहात एखादा पेशंट सापडल्यास आपण संपूर्ण बिल्डिंग क्वारंनटाईन करता,बिल्डिंगला बांबू बांधता. बिल्डिंगमध्ये जाण्यास व येण्यास लोकांना मनाई करता आणि थोडक्यात तेथील लोकांना आयसोलेट करता.करोनाचा संसर्ग त्या इमारतीतून आजूबाजूला होऊ/पसरू नये यासाठी आपण ही काळजी घेत असता. मग अशा सर्व उपायोजना करित असताना आपण अचानकपणे असे कोविड सेंटर नागरी वस्त्यांमध्ये कसे उभे करू शकता. तरी आमची आपणास मागणी आहे की आपण नागरी वस्त्यांपासून आयसोलेटेड अशा सिडकोच्या उपलब्ध पार्किंगच्या जागा,सिडकोकडे उपलब्ध असलेले मोकळे भूखंड, होटेल्स त्या जागेत अशी कोविड सेंटर उभारावीत तरच खऱ्या अर्थाने क्वारंनटाईन वा आयसोलेशन शब्दांना काही अर्थ राहिल. अन्यथा आपले हे निर्णय तुघलकी ठरण्याची दाट शक्यता आहे आणि नागरीवस्यांमधील कोविड सेंटर मुळे जर आजूबाजूस नसलेला करोना आढळून आला तर त्याचे पातक पालिकेस लागु शकते याचाही आपण विचार करावा.

दरम्यान राजेश गायकर यांच्या या मागणीला स्थानिक नागरिकांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळत असून महानगरपालिका आयुक्त यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.