Press "Enter" to skip to content

रोहा वनविभागाची कारवाई : बेकायदेशीर कात वाहतुक करणारे वाहनासह गजाआड

सिटी बेल लाइव्ह । समिर बामुगडे । रोहा । 🔷🔶🔷

उपवनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन फिरते पथक रोहा यांनी बेकायदेशीर काताची वाहतुक करणारी अशोक लीलंड वाहन क्रमांक GA-03-N-5866 मौजे तळवली कोलाड, मुंबई गोवा रस्त्यावर पकडून तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

आरोपी कृष्णा निवृत्ती बर्गे रा.मापसा गोवा (वाहन चालक), उत्पादक नारायण दत्ताराम जाधव रा.सावंतवाडी सिंधुदूर्ग. सदर वाहना मध्ये २५किलो चे ५६ बॉक्स असे १४००किलो कात ज्याची बजार किंमत अंदाजे १४०००००/- रूपये अशोक लेलांड वाहन किंमत ५०००००/-. जप्त करण्यात आला असून भारतीय वन अधिनियन १९२७ चे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक रोहा श्री राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनखाली,संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वनक्षेत्रपाल श्री इच्छांत कांबळी, वनपाल कोलाड श्री दामू वारगुडे,वनरक्षक फिरते पथक रोहा श्री अजिंक्य कदम,वनरक्षक आंबिवली प्रवीण शिंदे ही टीम करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.