Press "Enter" to skip to content

तळोजा औद्योगिक विभागातील डाँक्टरांचा कोरोना योद्धा गौरव

किरण पाटील यांची समाजिक बांधिलकी : डाँक्टरानी कोरोना संकटात केलेल्या कामाची पोहच पावती मिळाल्याचे केले समाधान व्यक्त 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील । 🔶🔷🔶  

सामाजिक बांधिलकी जपत किरण पाटील यांनी आज आपल्या मुलीचा वाढदिवस कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून अविरत जनतेची सेवा केली त्या डाँक्टराना कोरोना योद्धा म्हणून  गौरविण्यात आले. कामगार नेते प्रकाश म्हात्रे व काँग्रेस रायगड जिल्हा काँग्रेस युवा अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात  आले.   

  मटन आणि दारुची पार्ट्या असा रिवाज आता वाढदिवसाचा झाला आहे. गाजावाजा करून केला नाही तर तो वाढदिवस कसला. पण किरण बाल्राराम पाटील यांनी असा वाढदिवसाना बगल देत त्यांनी आज प्रर्यत आपल्या आई वडिलांपासून मुलांचा वाढदिवस आदिवासी व गावातील शाळामध्ये साजरा केला आहे यावेळी ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी आवश्यक वस्तूचे व खावूचे वाटप करत आले आहेत. आदिवासी मुलांमध्ये वाढदिवस साजरा करत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे काम किरण पाटील यांनी केला आहे. ‘ पुत्र असावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” या उक्ती प्रमाणे किरण पाटील समाज कार्य करताना आपल्या आई वडिलांचे नाव उज्वळ करत आहेत. मग त्यासाठी पाणी प्रश्न ,  रस्त्याचा प्रश्न,  वीजेचा प्रश्न असो अथवा कासाडी नदीचे प्रदूषण असो त्यांची तळमळ कायम असतेच. तळोजा औद्योगिक विभागालगत गावांना कोरोनाचा शिरकाव होवू नयै म्हणून ज्या स्थानिक डाँक्टरानी जीव धोक्यात घालून येथील जनतेची सेवा केली त्यांचा गौरव व्हायलाच पाहिजे या एकाच उद्देशाने किरण पाटील यांनी आपल्या मुलीचा 11 व्या वाढदिवसानिमित्त या सर्व डाँक्टराना कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह व शाल देवून गौरविले

यामध्ये डाँ. संतोष जगे, डाँ. वैशाली पाटील,  डाँ. संतोष अगलावे,  डाँ सतिज भोईर, डाँ. राहुल भोईर, डाँ सचिन म्हात्रे, डाँ स्वप्निल भोईर, डाँ अमर राजे,  डाँ वरदंडे,  डाँ वर्षा पाटील, डाँ. अमोल राजे या सर्व कोरोना योद्धानी एमआयडीसी मधील पेंधर, नावडे,  पडघे, तोंडरे, देविचापाडा, घोटगाव, वलप, पडघा,  कानपोली, खैरणे या लोकांची कोरोना माहमारीत अहोरात्र सेवा केलीच पण शासनानी त्याच्यावर कोरोना रुग्णालयाची जबाबदारी दिली होती तीही पार पाडली. असा डाँक्टरांचा गौरव कामगार नेते प्रकाश म्हात्रे,  काँग्रेस रायगड जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, समाजसेवक बाळाराम बुवा पाटील, पत्रकार विकास पाटील,  शाळेचे मुख्याध्यापक सुनिल चंदनशिवे, अक्षय पाटील, किरण पाटील किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.