Press "Enter" to skip to content

शिरवली येथे कोरोना योद्ध्यांचा विशेष सन्मान


सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷

रोहे तालुक्यातील शिरवली या गावी जीवघेण्या कोरोना महामारीत कोरोना योद्धा म्हणून विशेष कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्धांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला आहे.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.युवक अध्यक्ष तथा युवा नेते महेंद्र पोटफोडे व भाई पोटफोडे यांच्या संकल्पनेतून खांब येथील डॉ. महेंद्र म्हात्रे, डॉ. बालाजी वाखरकर,संतोष मेडिकलवाले, महावितरण अभियंता नितीन जोशी, वायरमन कदम,पो.पाटील कल्पेश पिंपळकर,आस्था सेविका कौशल्या भोईर,अंगणवाडी सेविका माई कचरे आदींचा सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.युवक अध्यक्ष तथा युवा नेते महेंद्र पोटफोडे व भाई पोटफोडे,सरपंच सौ.जाधव,उपसरपंच सौ.पिंपळकर, सदस्य नथू शिंदे,संजय शेळके, भाऊ पोटफोडे आदींसह शिरवली ग्रामस्थ, महिला वर्ग व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.