Press "Enter" to skip to content

आदिवासी समाजातील एका ध्येय वेड्या मुलीची कहाणी

आदिवासी वारली समाजाची दिपाली निमले पोहचली झी मराठी डान्सींग क्विनच्या मंचा पर्यंत 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । अजय शिवकर । पालघर । 🔶🔷🔶

मनापासून केलेली अविरत मेहनत आणि अतुट आत्मविश्वास यांच्या जोरावर माणसाला कोणतेही ध्येय गाठून यशाच्या शिखरावर पोहचण्यास कोणीही रोखू शकत नाही ….

जगात कोठेही एखाद्या नवीन गोष्टीवर प्रथम लोक हसतात नंतर विरोध करतात. पण नंतर तिलाच स्विकारतात….खरंतर अशीच माणसं काहीतरी करून दाखवितात ज्यांना त्या गोष्टीच वेड असतं ……..

अशाच एका ध्येय वेड्या मुलीची कहाणी , जिच्याकडुन आज तिचा समाजच नाही तर अवध्या महाराष्ट्रातील लोक प्रेरणा घेतात ……..

दिपाली निमले ही पालघर मधील सफाला ह्या आदिवासीपाड्यातील वारली समाज्याची असून तिला लहानपणापासून डान्स करण्याची भरपुर आवड होती. लग्न असो, गणपती विसर्जन असो, किंवा नवरात्री असो, ती सगळ्यात पुढे नाचायला तयारच असायची.

कॉलेज मधे जेव्हा ती जायला लागली तेव्हा कॉलेज मधील सगळ्या प्रोग्राम मधे सहभागी होऊ लागली. मग तीची डांन्स ची आवड वाढू लागली. नंतर तीने तिच्याच राहत्या भागातील एक डांन्स ग्रुप सामील केला. मरोळ टरमीनेटर्झ डांन्स गृप… , त्यानंतर तर ती ग्रुप डांन्स कॉम्पेटीशन करू लागली आणि पारितोषिके बक्षिसे जिंकू लागली. पण असे तिला स्टेजवर लोकांच्यासमोर नाचताना पाहुन, तिचे नातेवाईक समाजातील मानसं नावे ठेवायला लागली. कशी मुलगी आहे लोकां समोर नाचते हिला लाज शरम पण नाही वाटत.

हे सगळं ऐकून तिच्या आई वडीलांना सुद्धा वाईट वाटू लागले. मग हळूहळू दिपालीच्या डांन्स साठी आई वडिलांचा ही नकार येऊ लागला. पण तरी सुध्दा दिपाली थांबली नाही. तिने डांन्स सराव कायम चालू ठेवला. मग ती मोठमोठे शुटींग आणि शो करायला लागली. मराठी आणि हिंदी गाण्याच्या बॅकग्राउंड डांन्सर म्हणुन काम करायला लागली. तिच्या आई वडिलांनी जेव्हा तिला मुवी साॕंगमध्ये हिरो-हिरोईन च्या मागे डांन्स करताना टी. व्ही वर पाहिले तसेच त्यांच्या या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद बघितला तेव्हा त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन तिला डांन्स मध्ये पाठिंबा देऊन तिचे मनधर्य वाढवू लागले. पण काही वर्षा नंतर असं झालं की तिचं वजन वाढत गेलं आणि ती अंगाने जाड होत गेली.

मग तिला शुटिंग शो मिळणे हळूहळू बंद होत गेलं. त्यामुळे तीच्या मनातून डांन्स करण्याची इच्छा निघुन गेली आणि तिने नोकरी करण्याचा विचार केला. दोन -चार जागी नोकरीसाठी ईन्टरव्हु देत असताना तिला कळाले की झी मराठीचा डांन्सिंग क्वीन साईझ लार्ज- फुल चार्ज रियालीटी शो चे ऑडीशन स्टार्ट झाले. ह्या शो साठी तीने शेवटचा ट्राय करायचा विचार केला आनि ती सिलेक्टही झाली आणि तीची डांन्स ची आवड आज अवघ्या महाराष्ट्रा समोर झळकत आहे. ती स्वत: तर पुढे जातच आहे सोबत, आदिवासी वारली समाजाचे नाव ही पुढे नेत आहे…….
      

तिच्या या प्रवासात ती यशस्वी पण कामगिरी करून या शो ची विजेती व्हावी ही आशा तिच्या सहीत तिच्या समाजाला सुद्धा लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.