Press "Enter" to skip to content

मुंबई जिंकली,विराटची जळली

अबु धाबी येथे बुधवारी (२८ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा ४८ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. हा सामना मुंबईने ५ विकेट्सने जिंकला. या विजयात सूर्यकुमार यादवने मोलाची कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळे मुंबईने २ गुण मिळवले. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई संघ १६ गुणांसह अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्यांचा रनरेट हा +१.१८६ इतका आहे.

नाणेफेक जिंकत मुंबई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बेंगलोर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. या धावांचे आव्हान मुंबईने १९.१ षटकात ५ विकेट्स गमावत १६६ धावा करत पूर्ण केले.

मुंबई संघाकडून फलंदाजी करताना धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्तम खेळी केली. त्याने ४३ चेंडूत सर्वाधिक ७९ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच इशान किशननेही २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर इतर फलंदाज २० धावांच्या आतच गारद झाले.

बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. यासोबतच ख्रिस मॉरिसनेही एक विकेट आपल्या खिशात घातली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने चमकदार कामगिरी केली. त्याने ४५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ७४ धावा कुटल्या. त्याच्यासोबत जॉश फिलिपनेही ३३ धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही.

मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी एक विकेट खिशात घातली.

बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यात सगळ्यात चर्चेत राहिली विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची जुगलबंदी.

सूर्यकुमारने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन्सची खेळी साकारली. 10 चौकार आणि 3 षटकारांसह सूर्याने फिनिशरची भूमिका निभावत मुंबईला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादव. वय-30. गेले दशकभर रणजी करंडक, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, इंडिया ए, आयपीएल अशा विविध स्पर्धांमध्ये सातत्याने रन्स करतो आहे. मात्र तिशीतही सूर्यकुमारला टीम इंडियाचे दरवाजे किलकिले झालेले नाहीत.

जंबो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडसमितीने टीम इंडियाची घोषणा केली.त्यात सूर्यकुमार टीम इंडिया च्या बाहेरच राहिलाय…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.