Press "Enter" to skip to content

१ नोहेंबर रोजी उरण सेंट मेरी हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन, परिवर्तन गृप व दुर्गमावळा प्रतिष्ठान यांच्या तर्फे रक्तदान शिबिर 🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह । उरण । रमेश थळी । 🔶🔷🔶

रक्तदान श्रेष्ठदान अशा भावनेतून केले जाणारे रक्तदान या रक्तदानाने अनेकांना नवजीवन मिळते ही परंपरा अनेक संघटनांनी सुरू ठेवली आहे. आज देशावर कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना देखील आपण समाजाचे काही देणे लागतो या ध्येयाने आपल्या जिवाची काळजी घेवून रक्तदान शिबिरे आयोजित करत आहेत.

या अनुषंगाने उरण मधील काही संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये उरण मेडिकल वेल्फेअर असोशीएशन ,नव परिवर्तन गृप व दुर्ग मावळा प्रतीष्ठान यांच्या सयुक्त विध्यमाने १ नोहेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत उरण सेंट मेरी हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी उरण मधील इच्छूक रक्तदात्याने या शिबिरात येऊन रक्तदान करावे असे आवाहन उरण मेडिकल वेल्फेअर असोसीएशनचे डॉक्टर सत्या ठाकरे, नव परिवर्तन गृपचे विरेश मोडकरकर, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश तांडेल यांनी प्रसिद्ध पत्रातून केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.