Press "Enter" to skip to content

आयडियल क्रिकेट ग्रुप दादर तर्फे पत्रकार विनायक पाटील यांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷

कोरोनाच्या कठीण आव्हानाला मोठ्या धैर्याने सामोरे जाऊन दादर गावातील जनतेच्या आरोग्य तपासणी कार्यात मोठ्या उत्साहाने मनापासून योगदान दिले व ही चळवळ यशस्वी करून जनतेला धीर देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले.

दादर गावातील जनतेची सेवा केल्याबद्दल डॉ.संजय ठाकूर तसेच कोरोनाच्या संकट काळात स्वतः बरोबर इतरांची काळजी घेऊन त्यांना वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करणे तसेच अनेकांना वस्तू वाटपाच्यावेळी सहकार्य करणे याचबरोबर तालुक्यातील अचूक माहिती वृत्तसंकलन करून जनतेपर्यंत वृत्तपत्राच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तम जबाबदारी पार पडण्याचे यशस्वी काम केल्याबद्दल पत्रकार विनायक पाटील यांचे आयडियल क्रिकेट ग्रुप दादर तर्फे दादर गावातील श्री कालभैरव मंदिरावर प्रांगणात सत्कार करण्यात आले.

डॉ.संजय ठाकूर व पत्रकार विनायक पाटील यांचे दादर ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.यावेळी संतोष म्हात्रे,संदीप पेरवी,प्रविण ठाकूर,वैभव ठाकूर, सुनिल पाटील,अतुल ठाकूर,नविन पाटील,समाधान पाटील,मंगेश म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.