Press "Enter" to skip to content

माथेरानच्या विकास कामांबाबत आ महेंद्र थोरवे यांची आदित्य ठाकरें सोबत चर्चा !

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव-कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔷

महाराष्ट्र राज्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सर्वांच्या प्रथम पसंतीचे ठिकाण असल्याने येथे बारामाही पर्यटक येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद उपभोगण्यास येत असतात . हा आनंद द्विगुणीत होण्यासाठी माथेरानमधील विकास कामांत वाढ होणे गरजेचे असल्याने या महत्वपूर्ण बाबींकडे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे विशेष लक्ष देऊन असतानाच आज पर्यटन – पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली माथेरानमधील पर्यावरण व पर्यटन विकास कामांबाबत चर्चा करणे संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती .

सह्याद्री राज्य अतिथी गृह – मुंबई येथे माथेरानमधील पर्यावरण व पर्यटन विकास कामांबाबत चर्चा झाली. सदर बैठकीत पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते . यावेळी माथेरानच्या नगराध्यक्षा सौ.प्रेरणा प्रसाद सावंत तसेच प्रधान सचिव वने, पर्यावरण, पर्यटन, नगरविकास, आयुक्त एमएमआरडीए , जिल्हाधिकारी रायगड निधी चौधरी , प्रांत अधिकारी कर्जत परदेशी तसेच मुख्याधिकारी माथेरान , गटनेते प्रसाद सावंत , नगरसेवक संकेत भासे आदी उपस्थित होते .

माथेरान विकास कामांबाबत कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी माथेरानसाठी विशेष पर्यटन कामे आणि निधीची मागणी केली .तसेच येथील निसर्ग नियमित मातीची धूप थांबवणे याबाबत चर्चा करून उपाययोजना करणे , रोप – वे , पॅराग्लायडिंग यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे ,माथेरानकरिता नेरळ – दस्तुरी मार्ग वगळता इतर रस्ता तयार करणे ,पर्यटन वाढ उपाय यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत महत्वपूर्ण मुद्दे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी चर्चेसंदर्भात सुचविले .

तर पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली , सोईल कंसर्वेशन,वन विभागाच्या परिसराला फेंसिंग, झाडांचे सर्वेक्षण , व्हॅली क्रॉसिंग/साहसी खेळ परवानगी , वाहतूक आणि मालवाहतूक समस्या , पर्यायी मार्ग-रोप वे/फिनिक्युलर रेल्वे सुरू करणे, निवास व न्याहरी योजना सुरू करणे ,विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय ,पेमास्टर /पांडे गार्डन विकसित करणे अथवा थीम पार्क बनविने , फॉरेस्ट पार्क सुशोभिकरण आकाशगंगा प्रकल्प नूतनीकरण , झरे-पाण्याचे स्तोत्र पुनर्जीवित करणे , सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.माथेरान ची ओळख ही “माथेरान” म्हणून अबाधित राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे मा. आदित्यसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी माथेरानच्या विकास कामांबाबत आदेश अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत.
त्यामुळे मा. पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या मुद्द्यांचा विचार करून मान्यता देतील व भविष्यात माथेरान या गिरीस्थान पर्यटन थंड हवेच्या ठिकाणाचा लवकरच कायापालट होईल यात शंकाच नसेल .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.