Press "Enter" to skip to content

स्वप्न

स्वप्न
पापणीत मिटल्या अभाव का झोपेचा ?
पण संचार खुला कडू गोड स्वप्नांचा
गत काळाची तर कधी उद्याची असती
मालिकेत अखंड मात्र सुसंगत नसती

मी हसते रडते कुशीस शतदा वळते
योजने चालते आणि कितीदा पळते
स्वप्नांची सा-या होते भाऊगर्दी
किरणांसह पहिल्या झोप लावते वर्दी

उगवताच दिनकर नवा गडी नव राज्य
झेलण्यास जगणे पुन्हा नव्याने सज्ज
घेते न कधी या स्वप्नांचा मागोवा
वेडी अपूर्णता गोड वाटते जीवा

हव्यास सुखाचा मज दिवा स्वप्न दावी
झोपता दिवसभर मग पुर्ण कधी व्हावी?
या स्वप्न उदीमी सारे संधीसाधू
म्हणते नियती मी कुणा कुणाला रांधू ?

निलिमा देशपांडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.