Press "Enter" to skip to content

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. अलका नाईक

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । दिव्या पाटील /पी. डी.पाटील । 🔷🔶🔷

काव्यप्रेमी शिक्षक मंचाच्या अनुभवी मार्गदर्शिका, तेजस्विनी महिला संस्था, पुणेच्या सल्लागार, नक्षत्रांचे देणे काव्यमंच, मुंबईच्या सहसचिव, पत्रकार, ओरिएनटल ह्यूमन राईट्स मुंबईच्या सेक्रेटरी, सुवर्णपदक प्राप्त सन्माननीय साहित्यिका, संपादिका डॉ.सौ.अलका भरत नाईक , मुंबई, यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. शरद गोरे यांनी घोषित केले आहे.

डॉ नाईक यांची अनेक साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी आचार्य (डॉक्टरेट) ह्या बहुमान- पदवीसह अनेक मानाच्या उपाध्या प्राप्त केल्या आहेत; तसेच अनेक मोठमोठ्या संस्थेच्या आजी, माजी सभासद राहिल्या असून प्रोसेसर ऑफ इकॉनॉमिक्स व कॉलेजच्या प्रमुख प्रशासक आहेत. अनेक कविता, चारोळ्याचे लेखन, वाचन करताना अनेक आवडी,छंद जोपासलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय सभा-संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे, (नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, लंडन, दुबई ई.), कैलास-मानससरोवर परिक्रमा पूर्ण केली आहे व त्यांचे लेखन आजपर्यंत अनेक नामांकित वृत्तपत्र, मासिकात, दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले असून आपल्या दैनंदिन जीवनातील भरपूर वेळ सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, संशोधनात्मक, गरजू विद्यार्थ्यांना उद्बोधन करणे इ. कार्यासाठी सक्रिय राहून देत असतात.

शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र तसेच मोटिवेशनल ट्रेनर म्हणून काम करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून नवीन आधुनिक भारतासाठी सदैव वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांना मदत करणे-- मुंबई पुणे, कोकण इ., नर्मदा किडनी फाउंडेशनसाठी काम करणे - किडनी बचाव आंदोलन,... अवयवदान चळवळीमध्ये सहभाग, अमोघ फाउंडेशन मुंबई यांच्याबरोबर हेअर डोनेशन- केशदान - चळवळीमध्ये सक्रिय सहभाग, तसेच डिव्हाइन रेलेशन्स यामध्ये कॅन्सर,टी. बी, कोड इत्यादी आजारातून बरे झालेल्या व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्ती यांना जोडीदार निवडीसाठी एकत्र आणणे, आपनु घर वृद्धाश्रम -बोरीवली यांच्यासाठी कार्य करणे, ब्लाइंड असोसिएशन बोरीवली यांना मदत करणे, कॅन्सर पेशंट नूरी मशिद लोअर परेल, बोर्जेस होम वांद्रे -कॅन्सर पेशंट यांना मदत करणे कोकण विभागात महिला सबलीकरण आणि व्यवसाय वृद्धी करणे व यासाठी राजापूर- जैतापूर भागामध्ये काम करणे, याशिवाय मानसोपचार तज्ञ म्हणून म्हणून सदैव लोकांना मदत करणे, महिलांसाठी मोटिवेशनल ट्रेनर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ई., फिल्म रायटर्स असोसिएशनसाठी काम करणे, विविध संगीत आणि नृत्याचे कलाकारांना सक्रिय मदत, विद्यार्थ्यांची मानसिकता सुधृढ व्हावी म्हणून अनेक ठिकाणी ग्रंथालयांना पुस्तके दान करणे ई. अनेक कार्य अनेक वर्षे त्या सातत्याने करत आहेत.

आज त्यांच्या वयापेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त असून राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार- (केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते), शिक्षणाच्या प्रसारासाठी सुवर्णपदक चेन्नई, जीवनगौरव पुरस्कार अमरावती, हिरकणी पुरस्कार मुंबई, कविरत्न पुरस्कार, बेस्ट टीचर अवार्ड, समाजसेवा पुरस्कार मुंबई संध्या न्युज पेपर अवार्ड, मुंबई, अखिल भारतीय राष्ट्रीय पत्रकार संघ, नाशिक यांच्यातर्फे विशेष समाजसेवा पुरस्कार, राष्ट्रीय रत्न अवार्ड, नागपूर अशा काही मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने समाजात त्यांचे खूप कौतुक होत आहे. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री. राजकुमार काळभोर व कोकण प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रसनकुटे यांनी नाईक मॅडमना शुभेच्छा दिल्या आहेत . “ही नवीन जबाबदारी म्हणजेच ज्येष्ठांचा माझ्यावर असलेला विश्वासच आहे आणि ती मी आनंदाने पार पाडेन” असे डॉ. अलका नाईक यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.