Press "Enter" to skip to content

खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा
रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खा तटकरे यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉजीटिव्ह आले आहेत. अशी माहिती त्यांनी स्वतः समाज माध्यमांद्वारे दिली आहे, सध्या प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लवकरच सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी बरा होऊन सेवेत रुजू होईन असा विश्वास खा. तटकरे यांनी व्यक्त केला आहे. निसर्ग चक्रीवादळ व कोरोनाच्या संकटात खा. तटकरे यांनी अविरत परिश्रम घेतले. जनतेला अधिकधिक मदत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. मतदारसंघातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ते नियमित बाहेर पडत, अधिकाधिक लोकांच्या ते संपर्कात आले होते. प्रशासनासमवेत देखील झालेल्या अनेक बैठकात ते सहभागी झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.