Press "Enter" to skip to content

शब्द जुळवुनी कथा सांगती

शब्द जुळवुनी कथा सांगती

अमृतबिंदू अक्षर होती
अक्षरातुनी शब्द उमटती
शब्दां जोडुनि वाक्ये जुळती
वाक्ये गुंफुनि कथा रंगती ||
जोडुनि एका एका अक्षर
शब्द जाहले स्वरूपसुंदर
कथारूप घेउनी निरंतर
उभे ठाकले जोडुनिया कर||
तपोधन श्रीज्ञानेशाने
निर्मियले ते अक्षरलेणे
ज्ञानेश्वरी या अभिधानाने
वन्दित आम्ही तया सु-मनाने ||
शब्दांची कधी शस्त्रे होती
कधी नयनी निर्झर पाझरती
क्षणात गमती करुनी हसविती
शब्द जुळवुनी कथा सांगती ||
हृदयामधल्या भावभावना
शब्द फुलातुन मूर्त जाहल्या
कथाबीज होउनी कशा त्या
गूज मनीचे सांगू लागल्या ||

मनोहर काजरेकर, जांभवडे, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.