Press "Enter" to skip to content

सिंहगडाच्या कुशीतला मावळा

सिंहगडाच्या कुशीतला मावळा

     कालचा दसरा माझ्यासाठी अभूतपूर्व ठरला. कोविड मुळे सीमोल्लंघन आणि सोहळे यावर निर्बंध आलेले त्यामुळे विशेष बातम्या नव्हत्या.नवरात्र कधी आले आणि कधी गेले ते कळलेच नाही.इतके निरुत्साही नवरात्र या पूर्वी कधीही पहिले नव्हते.अर्थातच त्यामुळे यंदाच्या दसऱ्या मध्ये काहीही दमदार असेल असे वाटत नव्हते.पण आमच्या आबांनी सिंहगड पाचशेव्यांदा सर केल्याची बातमी आली आणि दसऱ्याला सुवर्ण झळाळी आल्यासारखे वाटले.तनाने पनवेल मध्ये असलो तरीही मनाने मात्र सिंहगडावर फिरुन आलो. मारुती गोळे अर्थात आबा गड किल्ले सर करण्याचे विक्रम करत असताना तिथल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा खोलात जाऊन अभ्यास करत असतात हे विशेष. कालचे त्यांचे व्हर्टीकल सीमोल्लंघन म्हणजे अभूतपूर्व.त्यांच्या सेनेला “पायदळ एक वादळ” असे का म्हणतात ते पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले.
    सिंहगड माझा जीव की प्राण आहे, मला जगणं शिकवले,प्रेरणा दिली, आरोग्यमंत्र दिला जीवनात जे काही चांगलं मिळालं त्यात सिंहगड सुद्धा एक आहे.अशी इमोशनल प्रतिक्रिया आबांनी दिली.ते पुढे म्हणाले की,अमावस्या असो नाहीतर पौर्णिमा, उन्हाळ्यात हिवाळ्यात अन खास करून पावसाळ्यात अशा सगळ्या ऋतूत सिंहगड ट्रेक केला
मग त्यात पहाटे दुपारी अन मध्यरात्री अगदी रात्री 12 ला सुद्धा एकट्याने सिंहगड बऱ्याच वेळा केला आहे.
पाऊल अन पाऊल प्रत्येक टप्पा अगदी डोळे मिटून चढाई करता येईल इतका पाठ झाला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज असणारे आबा गड कोटांवर मनापासून प्रेम करतात.या अवलियाचा एक विक्रम आहे,त्यांनी 2014 साली 30 मिनिटात सिंहगड सर केला आहे.आजमितीला 923 गड सर केलेत.लवकरच  हजारी मनसबदार होतील.
     आबांचे मेंटोर इतिहास संशोधक डॉ नंदकिशोर मते  यांचा मागील आठवड्यात मध्ये वाढदिवस झाला. आबांनी त्यांचा विक्रम गुरुवर्य महोदयांना भेट म्हणून सादर केला.इतिहासाला लोकांमध्ये मध्ये आणण्यासाठी कुणीतरी इतिहासात डुंबायला हवे.आबा रोजचं इतिहासात सुर मारत सच्या इतिहासाला गवसणी घालत असतात.इतिहास संशोधन मंडळे असोत की,ग्रंथालये असोत.दस्तावेज,बखर,शिलालेख,ताम्रपट,नोंदी यांचे अध्ययन करताना आबा भारावले गेले असतात.अशा या सिंहगडाच्या कुशितल्या मावळ्याला मानाचा मुजरा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.