Press "Enter" to skip to content

कसा जाईल आज आपला दसरा, वाचा आपले राशिभविष्य

🌞 आज चे राशिफल 🌞
रविवार २५/१०/२०२०

🔴~~~~🔴

🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )
( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)
नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका
आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे.

🕉 राशी फल वृषभ 🐂 ( TAURUS )
( जन्माक्षर – ई,उ,ए,ओ,वा,वी,वु,वे,वो)
नक्षत्र –🌞कृतिका,🌞रोहिणी(,🌞मृगशीर्ष
एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.

🕉 राशी फल मिथुन👫 ( GEMINI )
( जन्माक्षर -का,की,कु,घ,ङ,,छ,के,को,हा)
नक्षत्र 🌞मृगशीर्ष🌞आर्द्रा🌞पुनर्वसु
“चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. “

🕉 राशी फल कर्क ( CANCER )
( जन्माक्षर ही,हू,हे,हो,डा,डी डू,डे,डो,)
नक्षत्र 🌞पुनर्वसु🌞पुष्य🌞अश्लेषा
काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. बेर्पवाईने वागु नका.

🕉 राशी फल सिंह( LEO )
( जन्माक्षर -मा,मी,मू,में,मो,टा,टी,टू,टे,)
नक्षत्र 🌞मघा🌞पूर्वा.फा.🌞उ.फाल्गुनी
हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील.

🕉 राशी फल कन्या 👩‍🦰 ( VIRGO )
( जन्माक्षर – टो,पा,पी,पू,ष,ण,ठ,पे,पो,)
नक्षत्र 🌞उ.फा🌞हस्त🌞चित्रा
शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.

🕉 राशी फल तुला⚖️( LIBRA )
( जन्माक्षर – रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते,)
नक्षत्र 🌞चित्रा🌞स्वाती🌞विशाखा
वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या.

🕉 राशी फल वृश्चिक 🦂 ( SCORPIO )
( जन्माक्षर – तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यू,)
नक्षत्र 🌞विशाखा🌞अनुराधा🌞ज्येष्ठा
आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील.

🕉 राशी फल धनु🏹 ( SAGITTARIUS )
( जन्माक्षर – ये,यो,भा,भी,भू,ध,फ,ढ,भे,)
नक्षत्र 🌞मूल🌞पूर्वा.आषाढ🌞उ.षा
“भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. “

🕉 राशी फल मकर 🐊 ( CAPRICORN )
( जन्माक्षर – भो,जा,जी,खी, खू,खे, खो,गा,गी,)
नक्षत्र —🌞उ.षा🌞श्रवण🌞धनिष्ठा
वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल. आर्थिक लाभ मिळेल.

🕉 राशी फल कुंभ 🏺( AQUARIUS )
( जन्माक्षर – गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,दा,) नक्षत्र— 🌞धनिष्ठा🌞शततारका🌞पू.भाद्र
भावनांच्या भरात वाहून जाऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याला त्रास होऊ शकतो. आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. संपूर्ण दिवस वातावरण होकारात्मक राहील.
सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील.

🕉 राशी फल मीन 🦈 ( PISCES )
( जन्माक्षर – दी, दू,थ,झ,ञ,दे,दो,चा,फ,ची,)
नक्षत्र —-🌞पू.भाद्र🌞उ.भाद्रपद🌞रेवती
प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.

ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे .

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.