Press "Enter" to skip to content

कोकणात महाविकास आघाडीत बिघाडी : शिवसेनेचा सुनिल तटकरेंविरोधात हक्कभंग

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकलच पाहिजे हीच राष्ट्रवादीची भूमिका : खा.सुनिल तटकरे 🔶🔷🔶

राष्ट्रवादीच्या सभापतीला शिवसेनेत घेऊन महाविकास आघाडीच्या धर्माला तिलांजली दिली : सुनिल तटकरे यांची खंत 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

शिवसेना आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे. आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे कोकणात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे.यावर सुनिल तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व स्वीकारावे यासाठी आमचे नेते शरद पवार साहेब यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे सरकार राज्यात प्रस्थापित झाले.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकलच पाहिजे हीच राष्ट्रवादीची कायम भूमिका राहिली असल्याचे खा.सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

मी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विविध खात्याचा मंत्री, तसेच खासदार या वेगवेगळ्या भूमिकेत काम केले असताना माझ्यावर हक्क भंग दाखल केलेला आहे. दापोली येथील राष्ट्रवादीचे सभापती व त्यांच्या यांना शिवसेनेत प्रवेश देत महाविकास आघाडीच्या धर्माला तिलांजली देण्याचे काम याठिकाणी झाले असल्याची खंत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.

माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये समज गैरसमज पसरू नयेत. म्हणून माझ्या विरोधात दाखल झालेल्या हक्कभंग स्विकृत करावा. अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली जाणार असल्याची माहिती खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. घटनेनुसार खासदार म्हणून मला बैठक बोलावता येते की नाही. हे ही तपासावे. आणि तातडीने मला नोटिस काढावी आणि त्याचे मी उत्तर देखिल देणार नाही. असं सांगत माझ्यावर हक्कभंगाची कारवाई होणार असेल तर ती करावी.

मात्र, महाविकास आघाडीचं सरकार टिकावं म्हणून माझ्यावर कारवाई करावी. मी सामोरं जाईन अशी स्पष्ट भूमिका खासदार सुनिल तटकरेंनी मांडली आहे. महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीत ग्राउंड झिरोवर वाद झाल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे हे वाद स्थानिक लेव्हलला मिटवण्यात दोनही पक्षाला यश आलेलं नाही. आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देता खासदार सुनील तटकरेंकडून परस्पर उद्घाटनं केली जात आहेत.

कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नसल्याचा आरोप करत माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे. आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोकणात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.