Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यात आजही द्विशतक पार : 216 नवीन रुग्ण

महानगरपालिका आयुक्तांचे हास्यास्पद दावे !

निट ऐका हे आयुक्त महोदयांचे दावे, रूग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात म्हणे यश आले ? टेस्ट वाढवल्या म्हणून रूग्ण वाढले ? म्हणजे लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर टेस्ट करता येणार नाही ?

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या रूग्णांनी आजही द्विशतक पार केले असून आज नव्याने 216 रूग्णांची नोंद झाली आहे. यात महानगरपालिका क्षेत्रातील 175 तर ग्रामीण भागातील 41 रूग्णांचा समावेश आहे.

समाधानाची गोष्ट इतकीच की, आज एकही मृत्यू झाला नाही तर महानगरपालिका क्षेत्रातील 134 ग्रामीण भागातील 57 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र तरीही कडक लाॅकडाऊन चा रुग्णांच्या संख्येवर कोणताचं परिणाम झाला नाही हेच खरं ! आणि त्यातही टेस्ट वाढवल्या म्हणून रूग्ण वाढले असा दावा पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख करीत असतील तो ही हास्यास्पद आहे. कारण याचा अर्थ असा कि लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर टेस्ट मोठ्याप्रमाणात करता येणार नाहीत ?

एकंदरीत काय तर प्रशासनाला स्वतः मेहनत घेऊन कोरोना आटोक्यात आणायचा नाही तर फक्त नागरिकांवर बंधने घालून आपण काहीतरी करतो आहोत हा दिखावा करण्यात धन्यता मानायची आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.