Press "Enter" to skip to content

कूपोषीत मुलांच्या मदतीसाठी सरसावली मुंबई ची संस्था

आमदार महेंद्र थोरवे च्या हस्ते करणार पोषण आहाराचे वाटप : 30 तीव्र कुपोषित मुलांना करणार आहाराची मदत 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔶

कर्जत तालूक्यातील तीव्र कुपोषित मुलांच्या मदतीसाठी मुंबई येथील सामाजीक संस्था प्ले अँन्ड शाइन फाउंडेशन सरसावली असुन या फाऊंडेशन च्या वतीने आज शनिवार दि. 24 ऑक्टोबर रोजी पोषण आहार वाटप करण्यात आला.

कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक संकेत भासे यांनी केलेल्या विनंतीवरून फाऊंडेशन मदत करायला तयार झाले आहे. मागील महिन्यात याच फाऊंडेशन च्या वतीने शिरसे येथील आदिवासी मुलांना हँपिनेस बाँक्सचे वाटप करण्यात आले होते, त्या वेळीच प्ले अँन्ड शाइन ग्रुप चे अध्यक्ष सार्थक वाणी यांनी कूपोषीत मूलांना मदत वाटप करण्याची घोषणा केली होती, त्या नूसार आज दि. 24 ऑक्टोबर रोजी तालूक्यातील 30 तीव्र कूपोषीत मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला.

कुपोषित मुलांना पोषण आहार वाटप करताना आमदार महेंद्र थोरवे

नगरसेवक संकेत भासे यांच्यावतीने सर्वच कूपोषीत मूलांना महिनाभर पूरतील एवढी अंडी देण्यात येणार आहेत. कर्जत पंचायत समीती चे गटविकास आधिकारी बालाजी पूरी, तालूका आरोग्य आधिकारी डॉ.सि. के. मोरे, प्रकल्प आधिकारी अनिकेत पालकर, कँन प्रकल्पाचे समन्वयक व दिशा केद्र चे कार्यकर्ते अशोक जंगले, सुपरवायझर,अगंवाडी सेवीका उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.