Press "Enter" to skip to content

कांजुरमार्ग येथे भाजपकडून रिक्षाचालकांना विशेष संरक्षक स्क्रीन व सॅनिटायझरचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । कांजुरमार्ग । पंकजकुमार पाटील । 🔷🔶🔷

भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबई चे लोकप्रिय – कार्यसम्राट खासदार श्री मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विक्रोळी विधानसभा महामंत्री, श्री संजय नलावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अश्विनी कराडे,जिल्हा महामंत्री, महिला मोर्चा यांच्या उपस्थितीमध्ये दि . २१ ऑक्टोबर ओजी वॉर्ड क्रमांक ११७ मध्ये जस्मिन स्टोअर च्या नाक्यावर, कांजूरमार्ग मधील रिक्षाबांधवांसाठी करोना बचावासाठी विशेष संरक्षक स्क्रीन तसेच मोफत सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास रिक्षाचालकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे जस्मिन नाक्यावरती रिक्षा स्टॅन्ड चे स्वरूप प्राप्त झाले होते. ह्या कार्यक्रमात मंगेश पवार विधानसभा अध्यक्ष-विक्रोळी विधानसभा,सुधीर राणे अध्यक्ष, कोकण विकास आघाडी, मुंबई, अश्विनी कराडे -जिल्हा महामंत्री -महिला मोर्चा, ऍड-कल्पना वेंकटेश संयोजक,ईशान्य मुंबई, महिला मोर्चा ,रमाकांत विचारे-उद्योजक, मोदी समर्थक,संजय शुक्ला महामंत्री, विक्रोळी विधानसभा, प्रशांत मुळे- जिल्हाअध्यक्ष, भाजप माथाडी, विवेक सावंत समन्वयक ,मराठा क्रांती मोर्चा,सीमा मोरे ,महिला महामंत्री विक्रोळी विधानसभा, स्नेहा जंगम महिला महामंत्री, वार्ड११७, नितीन चव्हाण महामंत्री,वॉर्ड ११७,प्रदीप आंब्रे सचिव विक्रोळी विधानसभा,अमोल पोखरकर अध्यक्ष, पश्चिम विकासआघाडी, दिपक कदम उपाध्यक्ष, विक्रोळी विधानसभा, रविन्द्र कदम जिल्हा उपाध्यक्ष, प्रेरणा सरवणकर महिला वॉर्ड अध्यक्ष, विल्सन किनी उपाध्यक्ष वॉर्ड ११७, राजेंद्र राजम उपाध्यक्ष वॉर्ड ११७ ,श्रेयस आजगेकर उपाध्यक्ष युवा, वॉर्ड ११७,प्रसाद मेहता मा.महामंत्री, विक्रोळी विधानसभा युवा ,निल सुभे उपाध्यक्ष, युवा विक्रोळी विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीसह राजेश सारंग, संतोष शिंदे, स्वप्निल मुरकर, सुनील पोखरकर, अनिल नार्वेकर, महेश चव्हाण, दत्ता परब, प्रफुल राणे, रितेश आजगावकर, प्रवीण सरवनकर, किशोर खाजनवडकर, उमाकांत पवार,भैरुजी फडके, चव्हाण, अरुण महाडिक, हितेश शहा आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

रिक्षाचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल भाजपा खासदार श्री मनोज कोटक ,तसेच श्री संजय नलावडे यांचे सर्व रिक्षा बांधवांनी यावेळी आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.