Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

देवीची महती सांगणारी आणि तिला केलेल्या प्रार्थनेची कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता. 🔶🔷🔶

देवीस प्रार्थना

संकटे - दुःख दूर करणारी

तारणारी तू या दुनियेला

कर जोडूनी करतो वंदन

मनोभावे माते मी तुजला...

सदाचारी अनं सद्गुणी जे

कृपा-दृष्टी असू दे त्यांच्यावर

रुद्ररूप तुझे दाखव अशांना

जे जगतात भ्रष्टाचारावर...

सात्विक रुप ते सतेज-सुंदर

ममता तुझी ती प्रेमळ-निर्मळ

परिस्थितीनुरूप अवतार घेशी

राक्षशी-वृत्तींना करशी घायाळ...

तुझा महिमा, कीर्ती अपार

विनम्र कर तू पापी-दुष्टांना

वाढू दे मानवता दशदिशांना

हेच मागणं - हीच प्रार्थना...

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई मो.- 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.