Press "Enter" to skip to content

स्वर्गीय राहूल हिरू मालूसरे यांच्या परिवारास भरघोस मदत

कामगार नेते महेंद्र घरत यांनी मिळवून दिला सुरक्षा रक्षकाच्या परीवारास न्याय 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । महाड । 🔷🔶🔷

स्वर्गीय राहूल हिरू मालूसरे रा. बिरवाडी, महाड हया सुरक्षा रक्षकाचा १० महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यु झाला होता. सोबत काम करणारे न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे संघटक विश्वास उतेकर व योगेश रसाळ यांनी ही बाब संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या निदर्शनास आणली असता, महेंद्र घरत यांनी लगेचच रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बोर्डाने त्याच्या औषधोपचारासाठी ७ लाख रूपये उपलब्ध करून दिले तसेच त्याच्या मृत्युनंतर त्याच्या परीवारास कायदेशीर नुकसान भरपाई मिळवून दिली.

त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे. संघटनेच्या प्रयत्नाने मृत सुरक्षा रक्षकाच्या परीवारास साडेदहा हजार रूपये पेन्शन व त्याच्या पत्नीस १० महीन्याच्या आतच त्याच्या जागी सुरक्षा रक्षक म्हणून रूजू करून घेतले त्यामुळे त्यांचा परीवार चालविणे सुकर होईल.

या प्रकरणात रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन भोसले साहेब तसेच सेकेटरी पवार साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मृत राहूल मालुसरे याच्या परीवाने कामगार नेते महेंद्र घरत यांची भेट घेवुन त्यांचे आभार मानले श्री. महेंद्र घरत यांनी यापूढेही काही मदत लागली तर ती करण्याची आश्वासन दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.