Press "Enter" to skip to content

शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी नेट-सेट बाधित प्राध्यापकांसाठी घेतला पुढाकार

सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले / मुंबई #

महाराष्ट्र युनियन ऑफ सेक्युलर टीचर्स (MUST) यांच्या मागणी वरून शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्या पुढाकाराने नेट सेटग्रस्त प्राध्यापकांच्या समस्या व पेन्शन संबंधित प्रलंबित मागण्या यावर चर्चा करण्यासाठी दिनांक १३ जुलै २०२० रोजी दुपारी २ वाजता माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी एक ऑनलाईन सभेचे आयोजन केले गेले. या सभेमध्ये माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत, शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे, उच्च व तंत्रशिक्षण सचिव श्री सौरव विजय, अप्पर सचिव श्री.विजय साबळे , डॉ धनराज माने, संचालक उच्च व तंत्रशिक्षण, तसेच संघटनेचे पदाधिकारी, डॉ विजय पवार, अध्यक्ष डॉ.शांतज देशभ्रतार, सचिव, डॉ निर्मला पवार, खजिनदार, डॉ निलेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष, डॉ शरद ताजणे उपसचिव , डॉ.विवेक मिरगणे, ऍडव्होकेट श्रीराम पिंगळे आणि इतर सदस्य उपस्थित होते.सदर सभेमध्ये MUST संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना विनंती केली की नेट सेटग्रस्त प्राध्यापकांच्या पदोन्नती व पेन्शन संदर्भातील समस्या सामंजस्याने सोडवल्या जाव्यात. सामोपचाराने या प्रश्नांवर तोडगा काढल्यास न्याय प्रक्रियेतील विलंब व खर्च टळू शकेल. विधान परिषदेच्या आमदार श्रीमती डॉ. मनिषा कायंदे यांनी प्राध्यापकांच्या अनेक वर्षापासून खितपत पडलेल्या नेट-सेट ग्रस्त प्राध्यापकांच्या नियुक्ती दिनांक पासून सेवा ग्राह्य धरून त्यांना अनुषंगिक लाभ व सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांना निवृत्ती वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाकडे लक्ष वेधून त्यावर ताबडतोब निर्णय घेऊन शासकीय आदेश त्वरित काढण्यात यावा याबाबत मंत्री महोदय श्री उदयजी सामंत यांना विनंती केली. माननीय मंत्री महोदयांनी सभेच्या चर्चेला उत्तर देताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्या सर्व निवृत्त प्राध्यापकांना त्वरित पेन्शन लागू करण्याबाबत उच्च व तंत्र विभागाचे सचिव श्री सौरभ विजय आणि संचालक डॉ. धनराज माने यांना दिले. माननीय मंत्री महोदय यांनी माननीय सचिव, अप्पर सचिव व माननीय संचालक यांजकडून या प्रकरणातील माहिती जाणून घेतली व यावर पुढील सखोल चर्चा करण्यासाठी आणखी सभा घेण्याचे निर्देश दिले. मंत्री महोदय म्हणाले की, सरकार शिक्षकांच्या प्रश्र्नांबद्दल संवेदनशील व सकारात्मक आहे. वरील सर्व प्रश्नांवर योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.