Press "Enter" to skip to content

उर्जामंत्री नितीन राऊत यांची उरण विज प्रकल्पाला भेट


विजेची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । 🔷🔶🔷

काही दिवसापूर्वी मुंबईत विजच गायब झाली होती. त्यामुळे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील विज प्रकल्पाला भेट देऊन विज निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच धर्तीवर उरणमधील विज प्रकल्पाला उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भेट देऊन प्रकल्पाची पहाणी करुन विजेची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश बैठकीत अधिकारी वर्गाला दिले.

मुंबईत विज गेल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसला होता. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून यासाठी विजेची क्षमता वाढविण्यासाठी लागणार्‍या साधनांची पहाणी करण्यासाठी त्यांनी राज्यातील विज प्रकल्पाला भेटी देण्याचे सत्र सुरु केले आहे.

आज उरणमधील बोकडविरा येथील विज प्रकल्पाला उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पहाणी केली. यानंतर येथील अधिकारी वर्गाबरोबर बैठक घेऊन या प्रकल्पात विजेची क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या साधनांची कमतरता आहे, यावर चर्चा करुन विजेची क्षमता वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील याची माहिती घेऊन त्याची पुर्तता करुन उरणमधील विज प्रकल्पाची विज निर्मिती करण्याची क्षमता वाढविण्याचे आदेश उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अधिकारी वर्गाना दिले आहेत.

यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले. उर्जामंत्री नितीन राऊत यांना उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन येथील 70 प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत. त्यांना नोकरीत सामावून घेणे व नोकर भरतीत स्थानिकांना सामावून घेणे तसेच वारंवार खंडीत होणार्‍या विजेच्या समस्येपासून सुटका करण्याच्या मागणीचे निवेदन उर्जामंत्री राऊत यांना देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष जे.डी. जोशी, यशवंत म्हात्रे, गणेश म्हात्रे, मिलिंद पाडगांवकर, कमळाकर घरत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज भगत, उरण विधानसभा मतदार संघ अध्यक्षा भावना घाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.