Press "Enter" to skip to content

भारतीय मजदूर संघाचे प्रांत कार्यालयावर २८ ऑक्टोबरला निदर्शने

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔷🔶

लेबर कोड २०२० मधील कामगार विधेयक मागे घ्यावेत या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाने पनवेल प्रांत कार्यालयावर येत्या बुधवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ या दरम्यान निदर्शने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.

शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार कपात यासाठी शासनाच्या परवानगीची मर्यादा 300 कामगार संख्येवरुन 100 कामगार संख्या करावी, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट रद्द करा, स्टॅण्डींग ऑर्डर लागू होण्याची मर्यादा 300 कामगार संख्येऐवजी 50 कामगार संख्या करा, संपासाठी नोटीसची मर्यादा 14 दिवस कायम ठेवा, कायम स्वरुपाचे काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम करण्याची तरतुद करा, सनदी अधिकार्‍यांना कायद्यातून सूट देण्याचे दिलेले अमर्याद अधिकार मागे घ्या.

कामगार संघटना नोंदणी 60 दिवसात देण्याची कालमर्यादा निश्‍चित करा. महिलांना रात्रपाळीत कामाला बोलवण्याचा निर्णय रद्द करणे आदीं मागण्यांसाठी पनवेल प्रांत कार्यालयावर येत्या बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी भारतीय मजदूर संघातर्फे निदर्शने सकाळी ११ ते १ या दरम्यान करण्यात येणार आहे. तरी कामगारांनी मोठ्या संख्येने कोरोनाची दक्षता घेत मास्क लावून सोशल डिस्टंटचा वापर करून सहभागी होण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.