Press "Enter" to skip to content

28 ऑक्टोबर ला मांडवा येथे भर समुद्रात रो रो पॅक बोट थांबवून आंदोलनाचा निर्धार

रोरो बोटसेवेने पर्यटनाला चालना, मात्र साडेतीन हजार स्थानिक मच्छिमारांच्या पोटावर कुऱ्हाड : आंदोलनाचा पावित्रा 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

मुंबई येथील भाऊचा धक्का ते अलिबाग येथील मांडवा या रो रो प्रवासीबोट सेवेमुळे  पर्यटनव्यवसायाला चालना मिळत असली तरी तीन ते साडेतीन हजार  स्थानिक मच्छिमारांच्या बोटी बंद होणार असेल तर स्थानिक मच्छिमारांनी आपले पारंपारीक व्यवसाय बंद करायचे काय असा संतप्त सवाल विचारत स्थानिक मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अलिबागच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने रो रो प्रवासी बोट सेवा सुरु करण्यात आली. रो रो सेवा सुरु करताना मांडवा येथे बॅक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे मांडवा बंदरात गाळ साचून मच्छिमारांना बोटी लावण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. रो रो बोट सेवेबाबत वारंवार मच्छिमारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या कार्यालयाकडे निवेदन दिले होते. एमएमबी कार्यालय मच्छीमारांसाठी कमी आणि अशा धनिकांच्या व्यवसायासाठी कायम पाठीशी असते त्यामुळे मच्छीमारांनी केलेल्या अर्जांना केराची टोपली असते.  खरं तर रोरो बोट सेवेने येणारा पर्यटक अलिबागच्य मासळीवर ताव मारतो पण रोरो बोट मालकाने यावर कहर म्हणजे   मच्छिमारांच्या बोटींवरच बंदीची मागणी केली आहे. कंपनीची ही दादागिरी एकूणच पर्यटन व्यवसायाला व स्थानिक मच्छिमारांना  परवडणारी नसल्याने ती दादागिरी मोडून काढण्यासाठी मांडवा परीसरातील सर्व मच्छीमार आता एकवटले आहेत.

अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील जवळजवळ साडेतीन हजार मच्छिमारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांसह काल रायगडच्या जिल्हाधिकरी निधी चौधरी यांना याबाबत निवेदन दिले असून येत्या 28 ऑक्टोबरला भर समुद्रात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.

या जनआंदोलनातून 28 ऑक्टोबर रोजी मांडवा येथे भर समुद्रात ही रो रो पॅक बोट थांबवून आंदोलन करण्याचा निर्धार या मच्छिमारांनी व्यक्त केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.