Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका पुन्हा सुरू

जिते येथे बाईकस्वार घसरून एक गंभीर जखमी : अपघातग्रस्तास देवदूत कल्पेश ठाकूर यांची त्वरित मदत 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश बाष्टे । 🔷🔶🔷

लॉकडाउनच्या काळात बंद असणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गावर तब्बल दोन महिन्यानंतर वाहतूक सुरू झाली असून या वाहतुकीबरोबरच दोन महिने खंडित राहिलेली अपघातांची मालिका पुन्हा सुरू झालेली आहे.

पेण जिते गावाजवळ रात्रौ 12:30 दरम्यान वडखळ कडून पनवेलकडे जात असताना रस्त्यावरील वाळूवर घसरून मोटरसायकलस्वार आदिनाथ त्रिंबक दराडे (वय 32) रा.बीड गंभीर जखमी झाला. अपघाताची बातमी कळताच अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर यांनी गंभीर जखमीस प्राथमिक उपचाराकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.