Press "Enter" to skip to content

पालीतील कारखानीस कुटुंबीयांतर्फे सुधागड तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान..!

पालीतील कारखानीस कुटुंबीयांतर्फे कोरोना योद्ध्यांचा केलेला  सन्मान उल्लेखनीय व प्रेरणादायी : आमदार अनिकेत तटकरे 🔶🔷🔶

आमदार अनिकेत तटकरे यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान..! 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जग कवेत घेतलं आहे. या संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवतेच्या व सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अविरत मानवी सेवा केली. अशा कोविड योद्ध्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत पालीतील कारखानीस कुटुंबीयांतर्फे कोरोना योद्ध्यांचा केलेला सन्मान उल्लेखनिय व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार  आ.अनिकेत तटकरे यांनी काढले. पुरस्काराने प्रेरणा मिळते व प्रेरणेने राष्ट्र घडते अशी भावना कारखानीस कुटुंबीयांनी जपली असल्याचे आ.तटकरे म्हणाले. 

सुधागड तालुक्यातील  लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, डॉक्टर व पत्रकार असोसिएशन आणि प्राध्यापक सुधीर पुराणिक यांचा विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी आ.तटकरे बोलत होते. 

     यावेळी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की कोरोनामूळे स्वच्छता व आरोग्य या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे. कारखानीस कुटुंबीयांनी कोरोनाकाळात लढणाऱ्या सर्व योद्ध्यांचा केलेला सन्मान उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होऊन काम करण्यास अधिक उभारी मिळाली आहे. यावेळी कारखानीस कुटुंबीयांनी आपली भावना व्यक्त करताना आपण समाजाचे काही देणे लागतो,एक  सामाजिक बांधिलकीची जाणीव यादृष्टीने हा कार्यक्रम हाती घेतला, या सन्मानाने सर्व  कोविड योध्याना  भविष्यात अधिक जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळेल. 

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा गिता पालरेचा, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, पंचायत समिती सभापती रमेश सुतार, सदस्या साक्षी दिघे व सविता हंबीर, उपप्राचार्य पुराणिक सुधीर तसेच निमंत्रक सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कारखानीस व माजी सभापती शुभांगी कारखानीस हे होते. कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन निंबाजी गीते, प्रास्ताविक मयूर कारखानीस व आभार प्रदर्शन भाग्यश्री कारखानीस यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.