Press "Enter" to skip to content

पत्रकार परिषदेत पेण नगराध्यक्षांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट

पेण नगरपालिकेचा अजब “कारभार” दोन वर्षे कामावर हजर न राहता कर्मचारी घेतोय पगार 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔷🔶🔷

मागिल आठ दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या पेण नगरपालिकेतील एक कर्मचारी मागच्या दोन वर्षांपासून कामावर हजर न राहता पगार घेत असल्याचा गौप्यस्फोट नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केल्याने दोन वर्षे शासनाचा फुकट पगार लाटणाऱ्या या कर्मचाऱ्याला कोणाचा ‘आशीर्वाद’ आहे अशी चर्चा पेण शहरात सुरु झाली आहे.

पेण नगरपालिकेत महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी स्वछता समन्वयक म्हणून विशाल सकपाळ यांची 2018 साली नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी मागील दोन वर्षांपासून कामावर येत नाही मात्र मासिक तीस हजार रुपये पगार त्याच्या खात्यात दर महिन्याला जमा होत आहे या बाबत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनीच पत्रकार परिषदेत माहिती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 कामावर हजर न राहता दोन वर्षे शासकीय पगार घेणाऱ्या विशाल सकपाळ याला कोणाचा पाठिंबा आहे. याची चौकशी होऊन शासकीय रकमेचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करावी.

प्रितम पाटील
गराध्यक्षा, पेण नगरपालिका 
 नगराध्यक्षांनी माझ्यावर केलेल्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.तसेच गैरहजेरीचा विषय घ्यायचा तर मी 10 सप्टेंबर पासून रजेवर असून ऑगस्ट महिन्यांपर्यंतच मी माझा पगार घेतला आहे.
विशालकपाळ 

कर्मचारी, पेण नगरपालिका 

यासंदर्भात मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्याशी पत्रकारांनी मोबाईल वर संपर्क साधला असता त्यांचा संपर्क झाला नाही

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.