Press "Enter" to skip to content

रिपब्लिकन एसटी कर्मचारी संघटनेचे 17 व्या वर्षात पदार्पण

  • आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करावे : सिताराम कांबळे 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । राजेश कांबळे । 🔶🔷🔶

एसटी महामंडळात किमान 20 ते 21 संघटना कार्यान्वित आहेत त्यापैकी अनुसूचित जाती जमाती आयोग शासन मान्यताप्राप्त रिपब्लिकन एसटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र महामंडळात कार्यरत आहे 2004 ला सोलापूर विभागात संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

आताचे संघटनेचे अध्यक्ष अरविंद नाग टिळक यांनी एसटी महामंडळात आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संघटनेची स्थापना केली.तद्नंतर संघटनेत मागास वर्गीय बहुजन कर्मचाऱ्यांवर वाढते अन्याय-अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी संघटना सतत काम करीत आहेत.एसटीचे वेळोवेळी होणारे कामगार करार यामध्ये कामगारांच्या हिताचे प्रश्न मांडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून चालू आहे तर महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या शिफारशीनुसार संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना बैठका घेऊन विभाग नियंत्रकांनी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणे अशी महत्त्वाची कामगिरी संघटनेने केली आहे व करीत आहेत.

मुंबई रायगड सोलापूर आदी विभागात संघटनेचे सभासद कार्यकर्ते पदाधिकारी एसटी मधील मागासवर्गीय बहुजन कर्मचाऱ्यांवर होणार्‍या अन्याय व अत्याचारा विरोधात लढत असून संघटना वाढीसाठी कार्य करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूर येथे होणाऱ्या 17 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अरविंद नागटिळक व सरचिटणीस सिताराम कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.