Press "Enter" to skip to content

शुश्रूषा हार्ट केयरतर्फे निळ्या रंगाची पीपीई कीट घालून कोरोनाविषयक जनजागृती

सिटी बेल लाइव्ह । आरोग्य प्रतिनिधी । 🔶🔷🔶

यंदा १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, दरवर्षी कॉलेज व ऑफिसला जाणाऱ्या महिला वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रोत्सव साजरा करीत असतात परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे नवरात्र उत्सवावर अनेक बंधने आली आहेत. कोरोनावर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपल्या सर्वानाच कोरोनाशी लढाई करावयाची आहे व याच जाणिवेतून नवी मुंबई नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आज एका कोरोनाविषयक जनजागृती करून निळा रंग साजरा केला.

यावेळी शुश्रूषा हार्ट केयरच्या नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफने निळ्या रंगाच्या पीपीई कीट परिधान करून हात धुणे, मास्क लावणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे याचा प्रचार केला. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, “हात वारंवार धुणे, मास्क लावणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणूनच आम्ही आज हा दिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला. कोरोना विषयक जनजागृती करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे”.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.