Press "Enter" to skip to content

शरीराला आवश्यक आयोडीन हवेच …… !

आज २१ ऑक्टोबर ..जागतिक आयोडीन न्यूनता दिन
मानवाला निरोगी राहण्यासाठी तसेच वाढीसाठी प्रथिने, जीवनसत्वे आवश्यक आहेत . तसेच आयोडीन सुद्धा आवश्यक आहे . हे आयोडीन द्रव्य शरीराच्या विकासाठी तसेच मानसिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे . मेंदू व शरीर यांचे कार्य व्यवस्थित राखण्यासाठी शरीराला थायरॉक्सिन ची आवश्यकता असते त्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते . याचे प्रमाण कमी झाल्यास मानवाचे दोन्ही बाजूचे गाल सुजतात व त्यातून गलगंड निर्माण होतो. तसेच मानसिक आजार होऊ शकतात . दृष्टी दोष व कमी ऐकू याने असे विकार होऊ शकतात . गरोदर स्त्रियांची अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते . शरीरात योग्य ते तापमान राखणे, स्नायूंची हालचालीसाठी ते उपयुक्त आहे . हा जागतिक आयोडीन नुन्यता दिन जागतिक आरोग्य संघटनेमार्फत १९८० पासून विविध देशात राबविला जातो . युनिसेफ, तसेच जागतिक आयोडीन न्यूनता कमतरता संघटना यासुद्धा या कमी सक्रिय सहकार्य करतात भारतात राष्ट्रीय गलगंड निवारण कार्यक्रम १९६२ पासून राबविला जातो . महाराष्ट्र राज्यात हा कार्यक्रम १३ जुलै १९८७ पासून राबविला जातो विशेष म्हणजे या कार्यक्रमास केंद्राचे १०० टक्के सहाय्य मिळते . महाराष्ट्र राज्याचे यासंबंधीचे कार्यालय मुंबई येथे आरोग्य भवन मध्ये आहे आयोडीन न्यूनता दिन साजरा करण्याचा उद्देश्य लोकांना या बद्दल जागरूकता निमार्ण करणे हा होय . आज जगातील एक तृतीयांश जनता या आयोडीनच्या नुन्यतेचे परिणाम भोगत आहे . जागतिक आरोग्य संघटनेनुसार आज जगातील सुमारे ५४ राष्ट्रांना याचा परिणाम सोसावा लागत आहे . शरीराला आवश्यक ते आयोडीन दररोज सुमारे १०० ते १५० ग्रॅम लागते . ते आयोडीन आपणास अनेक गोष्टीतून मिळू शकते . सर्वसाधारण पणे जमीन व पाण्यातून आपणास आयोडीन मिळू शकते . जमिनीतून आपणास ९० टक्के तर पाण्यातून १० टक्के यावर आपली गरज भाऊ शकते . जे त्यामध्ये दूध, भाजीपाला, अंडी, समुद्र मिनाऱ्यावरील मीठ, सी फूड इत्यादी गोष्टीतून मिळू शकते . स्त्रियांच्या गरोदर पणात जर आयोडीन कमी पडले तर त्याचा परिणाम नवजात बालकावर होतो आयोडीनच्या कमतरते मुळे .अशी बालके मतिमंद, मुकी बहिरे जन्मण्याची शक्यता असते आयोडीज जास्त झाल्यास ते लघवीवाटे बाहेर टाकले जाते .जेथे आयोडीनची कमतरता असते तेथे पिकावरही त्याचा परिणाम होऊन ती कमी आयोडीन युक्त होतात . सरकारने आयोडीन युक्त मिठाच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या आहारात योग्य ते आयोडीनचे प्रमाण राखूया व आपले जीवन आनंदमय व निरोगी बनवूया

“आयोडीनचे योग्य प्रमाण राखूया अनेक रोगांना पळवूया “

शांताराम वाघ पुणे


Shantaram Y Wagh

Shri A 4, Diamond Residency
Sector No 6, Plot No 86A
Moshi Pradhikaran 412105 Pune

Contact :+91 96234 525 53
E mail: swagh30948@gmail.com

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.