Press "Enter" to skip to content

लवकरच.. माथेरानची राणी दिमाखात धावणार !

अमनलॉज ते माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा सुरू करण्याचे महाराष्ट्र शासनाने दिले रेल्वे प्रशासनाला आदेश ! 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔶🔷

दरवर्षी प्रमाणे १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणारी माथेरानची मिनिट्रेन सुरू होण्याची शक्यता दिसत नसल्याने
दि .१५ ऑक्टोबर रोजी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत तसेच माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि गटनेते प्रसाद सावंत , माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोएल यांची पर्यटनास चालना मिळून रोजगार उपलब्ध होणेसाठी शटल सेवा सुरू करण्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.

त्यावेळी गोएल यांनी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शटल सेवा सुरू करणेसाठी राज्य शासनाची परवानगी पत्र आवश्यक असल्याचे सांगितले होते त्याच वेळी मावळचे खासदार श्रीरंग अप्पासाहेब बारणे यांचे शिफारस पत्र आणि मा नगराध्यक्षा यांचे मागणी पत्र महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र देण्यात आले तसेच त्यावेळेस मंत्रालय येथे उपस्थित असलेले खासदार तथा रायगड चे माजी पालकमंत्री सुनील तटकरे यांंनी नगराध्यक्षा आणि माजी नगराध्यक्ष यांचे सोबत मुख्य सचिव संजय कुमार यांच्या दालनात समक्ष भेट घेऊन पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार उपलब्ध होणेसाठी शटल सेवेचे महत्त्व पटवून दिले.

त्यास तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत मा मुख्य सचिव यांनी रेल्वे प्रशासनास तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश आपत्ती मदत व पुनर्वसन सचिवालयात दिले आणि त्या प्रमाणे आज मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांना अमनलॉज ते माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या पत्राद्वारे दिले आहेत.

सदर मान्यवरांनी केलेल्या प्रयत्नामुळेच लवकरच पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी माथेरानची राणी दिमाखात धावणार असल्याची प्रतिक्रिया माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.