Press "Enter" to skip to content

अबब… एवढा मोठ्ठा अजगर पाहिलात का कधी ?

कांबे येथे अक्षय गायकवाड व त्याच्या सहका-यांनी रेस्क्यू केला विक्रमी लांबीचा अजगर 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔶🔷

रसायनी परिसरातील कांबे या गावात अक्षय गायकवाड या सर्पमित्राने सहका-यांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास अकरा फुट लांबीचा अजगर पकडून त्याला खालापूर वनविभागाच्या निर्देंशानुसार सुरक्षित वन क्षेत्रात मुक्त केले आहे.

कांबे गावाच्या हद्दीत भला मोठा अजगर असल्याचे समजताच अक्षय गायकवाड याने आपल्या सोबत इतर सहकाऱ्यांना घेऊन कांबे गाठले.अजगर जरी वरवर सुस्त असल्याचे भासवत असला तरी तो कधी काउंटर ऍटॅक करेल याची शाश्वती नसल्याने अक्षयने सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या होत्या.

कृत्रिम प्रकाशात रेस्क्युअर्स त्या अजगराला सुरक्षित पकडण्यास सज्ज झाले. पूर्वानुभव असलेल्या अक्षयला हे ऑपरेशन थोडं कठीण वाटत होतं, कारण सहसा 7 ते 8 फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या तुलनेत मोठा आणि वजनदार देखील होता. प्रचंड ताकद लावून अजगर पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे अक्षयची दमछाक होत होती. मोका मिळताच तो अजगर अक्षरशः चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सावध असलेल्या अक्षयने सहकाऱ्यांच्या मदतीने शेवटी तो महाकाय अजगर पकडला.मात्र त्याने अजगर जातीचा एवढा मोठा सुमारे 11 फुटाचा साप पकडण्याची पहिलीच वेळ होती.

एवढ्या मोठ्या आकाराच्या अजगराला पकडण्यात यशस्वी झालेल्या अक्षय आणि त्याच्या सहकाऱ्यांचे या क्षेत्रातील तज्ञ अभिजित घरत, रोहिदास म्हसणे, योगेश शिंदे, नवीन मोरे यांनी कौतुक केले.

अक्षय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्या अजस्त्र अजगराला खालापूर तालुका वनविभागाच्या निर्देशानुसार सुरक्षित वन क्षेत्रात मुक्त केले. आपल्या अधिवासात जाताना मात्र तो अजगर काही घडलेच नाही या थाटात होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.