Press "Enter" to skip to content

रेणुका माता

रेणुका माता

आली रेणुका आमच्या घरी
चौरंग आणा, बसवा तिला
हळदी कुंकु कपाळी लावा
पंचारतीने तिला ओवाळा..

दुरुनी आली आमुची आई
बसवा तिला पाटा वरती
सजवा तिला नेसुन नऊवारी
खणा नारळाने औटी भरा. …

आई भवानी तुझ्या रूपाने
रेणुका आई आली ….
दहा दिवस पृथ्वीवर राहूनी…
आशीर्वाद देऊन जाते…
तु जगत माता,तु शीलभद्रा…
तु महिषासुर मर्दिनी. ..

जय अंबे माता ,जगदंबे माता
शंकराची अर्धांगी गौरी. ..
तुझी रुपं किती, तुझी नाव किती
तुझा आशीर्वाद असूदे आम्हावरी….

अपराजिता माधव घांगुर्डे.
खांदा काॅलनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.