Press "Enter" to skip to content

सोलापूरचे सुप्रसिद्ध वस्त्र निर्माते भाऊराया हँडलूम पनवेलच्या गोखले हॉलमध्ये

हातमाग व यंत्रमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न 🔶🔷🔶

सणासुदी निमित्त खरेदीसाठी पनवेल वासीयांसाठी पर्वणी : व पो नी शत्रुघ्न माळी यांच्या शुभहस्ते उद्घाटन 🔷🔶🔷

पनवेलकरांच्या सेवेमध्ये सोलापूर येथील सुप्रसिद्ध वस्त्र निर्माते भाऊराया हँडलूम रुजू झाले आहेत. भाऊराया यांनी बनवलेली हातमाग व यंत्रमाग वस्त्रे उपलब्ध झाल्याने सणासुदीच्या निमित्ताने पनवेलच्या जनतेला खरेदीसाठी एक आगळेवेगळे केंद्र निर्माण झाले आहे.

पनवेल च्या गोखले हॉल येथे हे प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. पनवेल शहर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या शुभहस्ते या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.

कोरोना महामारी नंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. आगामी काळामध्ये येणारे दसरा दिवाळी असे सण आपल्या जीवनात पुन्हा एकदा आनंद निर्माण करतील. या सणाच्या निमित्ताने पनवेल मध्ये हे सुरू करण्यात आलेले प्रदर्शन व विक्री केंद्र 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार आहे अशी माहिती संयोजक पांडुरंग पोतन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले की, खास सणानिमित्त सर्व खरेदीवर 20 टक्के डिस्‍काउंट देखील देण्यात येत आहे. अत्यंत खात्रीशीर व अत्युच्च दर्जाची वस्त्रे असल्या कारणामुळे या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे देखील पांडुरंग पोतन यांनी सांगितले.

पांडुरंग पुढे म्हणाले की हातमाग व यंत्रमाग यावर बनविलेले खादी आणि कॉटन या मटेरियल मधल्या साड्या, मदुराई कॉटन साडी, इरकल साडी, पटोला साडी, इरकल ड्रेस मटेरियल, पटोला ड्रेस मटेरियल,प्रिंटेड ड्रेस मटेरियल, सोलापुरी चादर, टॉवेल, पंचा, सतरंजी, प्रिंट बेडशीट,कॉटन कुर्ता, बंडी, खादी कुर्ता, लेडीज मटेरियल, वॉल पीस,काँटन गाउन असे विविध प्रकार वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पोतन यांनी समस्त पनवेल करांना या प्रदर्शन व विक्री केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी शत्रुघ्न माळी यांच्या समवेत नगरसेवक नितीन भाई पाटील, नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका नीता ताई माळी, शहर भाजपाच्या खजिनदार आदिती मराठे,मानसी मोरे,जागृती कदम आदी मान्यवरांच्या सह ग्राहक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.