Press "Enter" to skip to content

महिला – बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांचा कारावास

अमरावती:

ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्रिपद सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत.आठ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी आमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.