Press "Enter" to skip to content

सुधागड तालुक्यात 5 दिवसात आढळला नाही एकही कोरोना रुग्ण

सुधागडात एकूण 410 रुग्ण, 375 जणांची कोरोनावर मात, 25 रुग्णांचा मृत्यू 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷

सुधागड तालुक्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्न व परिश्रमाने तसेच जनतेच्या सहकार्याने कोरोना लवकरच हद्दपार होण्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारी (दि.14) उशिरा प्राप्त अहवालानुसार एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. तर 3 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सुधागड तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाची अमंलबजावणी खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. या उपक्रमा आधीपासूनच गावागावात जाऊन आरोग्य यंत्रणा, प्रशासन अशा प्रकारचे काम तालुक्यात करीत आहे.

औसुधागड तालुक्यातील वावलोली कोव्हिडं सेंटर.

सुधागड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे 410 रुग्ण झाले असून 375 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी यापुढेही स्वतःची काळजी घ्यावी, शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावे असे आवाहन तहसीलदार रायन्नावार यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.