Press "Enter" to skip to content

अलीबाग ची छकुली बनली भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक

तिन वर्षाची “शर्विका” दुसऱ्यांदा झळकली “इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔶🔷🔶

भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर,आदर्श बालगौरव क्रीडा रत्न पुरस्कार विजेती,ग्रँड मास्टर कु.शर्विका जितेन म्हात्रे.मू.लोणारे पो.थळ, तालुका अलिबाग जिल्हा.रायगड वय - तीन पूर्ण, हिने नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सुमारे ५१४१ फूट उंचीवर वसलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सर करून सलग दुसऱ्यांदा विक्रम नोंदविला आहे.

तिने हा विक्रम कोरोना योध्यां ना समर्पित. केला आहे.. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील तमाम डॉक्टर,पत्रकार,पोलिस,सफाई कामगार आणि इतर क्षेत्रातील सर्व कोरोना योध्यां ना मानवंदना दिली

सुमारे साडे पाच तासांच्या यशस्वी आरोहण करून तीने छत्रपती शिवरायांचा गारद च्या माध्यमातून जयघोष केला.

महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावर (साल्हेर) सर्वात कमी वयात पाऊल ठेवणारी शर्विका ही एकमेव कन्या ठरली आहे

तिच्या ह्या कामगिरीची नोंद सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.