Press "Enter" to skip to content

मराठा आरक्षणाला विलंब होईल तर आंदोलन चिघळेल : सुरेशदादा पाटील 

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर या निकालाचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले. या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात 52 संघटनांची ऐतिहासिक गोलमेज परिषद होऊन राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. राज्यसरकारने या इशाऱ्याची दखल घेत तातडीने बैठक लावून पदाधिकाऱ्यांसमवेत सकारात्मक चर्चा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना.अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेटीवार  आदींसह प्रमुख मंत्रिमंडळासमवेत पार पडलेल्या बैठकीत सरकारने  अनेक मागण्या मान्य केल्याने बंद तात्पुरता  स्थगित करण्यात आला. मराठा आरक्षणाला जितका विलंब होईल तितके मराठा आंदोलन चिघळेल असा सूचक इशारा मराठा समाज नेते सुरेशदादा पाटील यांनी यावेळी दिला. तर समाजाच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा विजयसिंह महाडिक यांनी दिला.

स्वहितासाठी झगडणारे नेतृत्व मराठयांना अमान्य असून समाजहितासाठी झटणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन आरक्षणाचा लढा पुकारल्याचे ताराराणी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष वंदनाताई मोरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.  मराठा आरक्षण व महाराष्ट्र्र बंदला जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे जाहीर आभार मानून फुले शाहू आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी तनमनधनाने योगदान देणार असल्याची ग्वाही सुरेशदादा पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षण चळवळीची सुरूवात करून मराठयांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या या आंदोलनाचे गांभीर्य अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री . विजयसिंह महाडीक यांनी राज्य शासनाच्या निदर्शनात आणून दिले. सर्व मागण्यांचे विवेचन करुन या महत्वपूर्ण आणि आवश्यक मागण्या पूर्ण करण्यासाठी देशभरामधे विविध संघटना आंदोलन करीत असल्याचे सांगितले.

विविध मान्यवरांची भेटी घेऊन मराठा आरक्षणास पूर्त स्वरुप येण्यासाठी श्री . विजयसिंह महाडीक प्रयत्नशील आहेत .  सदर बैठकीत उपस्थित असलेल्या शिवमती वंदनाताई मोरे सभागृहात मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मराठा आरक्षणास विलंब का ? असा रोखठोक सवाल उपस्थित केला . राज्यशासनाच्या अखत्यारीत असलेले प्रश्न आपण सोडवावेत . केद्रशासनाकडे मराठा- आरक्षणासाठी सहकार्य करण्याची नैतिक जवाबदारी राज्य शासनाने स्विकारावी असे शिवमती वंदनाताई मोरे यांनी सुचविले .

स्वहितासाठी झगडणारे नेतृत्व मराठयांना मान्य नाही तर समाजहितासाठी झगडणाऱ्या सामाजिक मराठयांच्या ५२ संघटनानी श्री सुरेशदादा पाटील व श्री . विजयसिंह महाडीक यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मराठा समाजाने विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या. व ठराव  मंजूर करून घेतले.

१. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. 

२. मराठा समाजाच्या मुलामुलींना शासनाकडून चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा मिळावा

३. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले . त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा .

४. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणारया मेगा भरतीला स्थगिती द्यावी 

५ . सारथी संस्थेसाठी १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी

६ . अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.

७.राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी .

८ मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे ध्यायेत . 

९.मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.

१० . राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. 

११ , स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी.  

१२. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.

१३ . राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. 

१४. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.

१५. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी. आदी मागण्यांची सरकारने पूर्तता करावी यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.  सर्व महिला – माता – भगिनी सक्रीय सहभागी स्वयंस्फुर्तीने होत आहेत त्यामुळे मराठयांच्या मागण्या मंजूर कराल अशी खात्री आम्ही राज्यशासनाकडे करतो. असे शिवमती मोरे म्हणाल्या. यावेळी भरत पाटील , अनिल वाघ, दिग्विजय मोहिते, वंदना मोरे, सुधाकर माने,धनाजी येळकर पाटील, जगदीश जाधव, सौ मेघा मोरे, अपर्णा भोसले,अक्षय पाटील, श्रुती वाडेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.