Press "Enter" to skip to content

नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र ची राज्यकार्यकारिणी बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह / संदिप टक्के / मुंबई #

नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट महाराष्ट्र च्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सभा रविवार दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी Zoom Aap वर संपन्न झाली.राज्याच्या अध्यक्ष शीतलताई करदेकर यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंग मध्ये विविध विषयांचे ठराव मांडून त्यांना मंजुरी देण्यात आली.

एनयुजे इंडिया चे ज्येष्ठ नेते मा शिवेंद्रकुमारजी यांचे निरिक्षण व मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
यावेळी संघटन सचिव कैलास उदमले, कोषाध्यक्ष वैशाली आहेर,रचना बो-हाडे, विशाल सावंत, सरचिटणीस सीमा भोईर तसेच राज्यभरातील जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांनी सहभाग घेतला. यात मुंबई,पुणे,सांगली,कोल्हापूर,औरंगाबाद,पालघर, रायगड, जळगाव,सातारा, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, जिल्ह्यातील प्रतिनिधींनी आपलं मनोगत व कार्य अहवाल मांडले.
राज्य अध्यक्ष शीतलताई करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली यावेळी प्रमुख ठराव मांडले गेले ते पुढीलपणे

1) ठराव क्रमांक 1– राज्यातील इतर कोणत्याही संघाच्या प्रतिनिधीला Nujm चे सदस्य करू नये…अर्थात त्याने तिकडे राजीनामा देऊन तेआपले सदस्य होऊ शकतात

2) ठराव क्रमांक 2-Nujm ची यावर्षीची सदस्य नोंदणी २०जुलै२०२० पर्यंत चालू राहील

3) ठराव क्रमांक 3– 30 जुलै २०२० पर्यंत तालुका व जिल्हा बांधणी करावी.

४) ठराव क्रमांक 4
सदस्य हितासाठी कृतीशील कार्यकर्त्याना जिल्हावार प्रतिनिधित्व देणे.

५) ठराव क्रमांक 5
रायगड, नवी मुंबई ची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी सुनिल कटेकर,रचना यांचेवर
व रत्नागिरी, जालना त समन्वय करण्याचे काम संदिप टक्के यांनी पुढाकार घेऊन पुर्ण करावे.

6) ठराव क्रमांक 6
पुणे जिल्ह्याची पूर्ण बांधणी रायचंद शिंदे यांनी ,जितेंद्र जाधव, आदिक दिवे, दिपक चव्हाण यांचे सहकार्याने करावी या ठरावांना सर्व सदस्यांची मते मांडून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली .

वैशाली आहेर यांनी आर्थिक अहवाल सादर करताना थकीत फी आणि इतर विषयांची माहिती दिली, काही पत्रकार दुसर्‍या संघटनेत असतात व पदासाठी फोन करून आपलेकडेच येतात, अशांना नाकारण्याची गरज व्यक्त केली.आपली युनियन जे काम करतेय ते खूप महत्त्वाचे म्हणून खूप जण सदस्य होऊ इच्छितात, जिल्ह्यातील पदाधिकारी पूर्ण सजगतेने सदस्य करतील असे मत मांडले.

जगताप यांनी आजपर्यंत दिलेल्या आय कार्ड बाबत माहिती अहवाल दिला.

आपले अध्यक्षीय मनोगत मांडताना शीतलताई म्हणाल्या की, कमी कालावधीत आपण राज्यात भरीव असं काम केलं असून या वर्षी कोरोना महामारीतमुळे लॉक डाऊन असताना प्रसारमाध्यमकर्मीना मदत देण्याचं काम राज्यभरात केलं. जे विषय आपल्याकडे आले त्यांना सहकार्य करण्याचे काम आपण केले. त्या सर्वांचे अभिनंदन!
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी च्या पत्रकारांचे थकलेले वेतनासाठी संघटनेच्या पाठपुराव्यामूळे यश मिळाले.
टीव्ही 9 चे कर्मचारी रोशन डायस यांचे निधनाने सगळेच हळहळले, आपण तो विषयही सर्वासमोर आणला.
कोरोना काळातील विमा संरक्षण आणि माध्यमकर्मींसाठी ,मीडियासाठी आर्थिक व इतर मदतीची मागणी आपण मार्चच्या अखेरीस केली होती, तसेच त्रिपक्षिय समिती गठीत होउन कर्मचारी, मालक व सरकार असा समन्वय करुन कर्मचाऱ्यांवर होणारे मनमानी अन्याय थांबायला हवेत अशी मागील काहीवर्षापासून आपण मागणी करतोय,त्यावर ठोस कृती या सरकारकडून होईल असा विश्वास आहे.
मागच्या काळात पत्रकारांसाठी केलेल्या जीआरमधे खूपशा त्रुटी आहेत त्यात सुधारणा आपण निदर्शनास आणून दिल्या आहेत,
माध्यमकर्मी हितासाठी सन्मानासाठी एक सर्वसमावेशक समिती गठीत होउन कायमस्वरुपी नियमावली तयार व्हायला हवी यासाठी आपली आग्रही भूमिका आहे .
इतर ३स्तंभांप्रभाणे आमचाही सन्मान व आमचे हक्क महत्वाचे आहेत याची जाणीव प्रत्येकानी ठेवायलाच हवी.
आरोग्य विमा,पेन्शन योजना,आदींचा फायदा काही मुठभरांना होतो , Nujm च्या पुढाकाराने जिल्हावार माध्यमकर्मींची व सदस्यांची नोंदणी केल्यास हे फायदे व श्रमिक म्हणून हक्क खऱ्या माध्यम कर्मचारी मिळतील.अस सांगत पत्रकार हा श्रमिक कामगार आहे त्यामुळे त्याची नोंदणी व्हावी, कंत्राटी व अंशकालीन पत्रकारांसाठी योग्य धोरण असावे यासाठी संघटना पाठपुरावा करत असल्याचं शीतलताई यांनी यावेळी सांगितले.
महिन्यातून एकदा जिल्हावार मीटिंग घेऊन समन्वय साधला जावा तसेच जे सदस्य पद घेतात पण काम करत नाहीत याबद्दल शीतलताईंनी नाराजी व्यक्त केली.जिल्हावार सदस्यांच्या सदस्य नोंदणी चे फॉर्म,फॉर्म-फी याचा हिशोब ठेवला गेला पाहिजे, अनेकांची फी जमा होत नाही. संघटनेसाठी वेळ नसेल अशांनी पदाची जबाबदारी घेऊ नये स्वतःहून दूर व्हावे.
जिल्हासमिती, तालुकासमिती निवड हा जिल्ह्यांचा अधिकार आहे.व्यक्ती नाही तर युनियन व सर्वांचे हित महत्वाचे आहे!
हा संघ नाही तर संघटना आहे, ती कृतीशील अलर्ट असायला हवीच.
एनयुजे इंडिया ही प्रसारमाध्यमकर्मींसाठी काम करणारी विश्वासार्ह युनियन आहे.
आणि एनयुजेमहाराष्ट्र कशी आणि काय काम करते हे या संकटकाळात सर्वांनी अनुभवला!
म्हणूनच सगळ्याबाबतीत सजगतेने काम होणे आवश्यक आहे यासोबत वाईट काळात जो मदत करतो तोच खरा पत्रकार असतो,
असे शीतल करदेकर यांनी स्पष्ट केले.
पुढच्या काळात सदस्य नोंदणी,साप्ताहिक, दैनिक,यु ट्यूब चॅनल, पोर्टल नियमावली करणे गरजेचे आहे,
जे स्वतःच्या हक्कासाठी लढतील तेच पत्रकार टिकतील.असे मुद्दे शीतलताई यांनी मांडले.आपल्या कार्यकाळात सर्वांच्या मदतीने राज्यात अनेक प्रश्न मार्गी लावले आणि यानंतरही आपण वेळोवेळी हवी ती मदत करू अशी ग्वाही शीतलताई यांनी यावेळी दिली.,

संघटन सचिव कैलास उदमले यांनी वेब मीटिंगचे सूत्रसंचालन केले

यावेळी रायचंद शिंदे(पुणे),संदिप टक्के(मुंबई), लक्ष्मण खटके(सांगली),डॉ सुभाष सावंत,विनोद पाटील,प्रकाश पाटील(कोल्हापूर),डाँ विनोद खाडे (सातारा) अब्दुल कादिर(औरंगाबाद),डाँ खाडे विजय देसाई(पालघर),रचना सपकाळ(पनवेल),आनंद शर्मा(जळगाव),सुनिल कटेकर(नवी मुंबई), तुषार गोसावी(ठाणे), आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.नेटवर्क अडचणीमुळे काही जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.
-मीटिंग मध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार संघटन सचिव विशाल सावंत यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.