Press "Enter" to skip to content

तांबडी याप्रकरणाची सूत्रे ऍड उज्वल निकम यांच्याकडे

रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणातील कुटुंबियांची ऍड उज्वल निकम यांनी घेतली भेट : घटनास्थळाची केली पाहणी 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशिल सावंत । 🔶🔷🔶

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची ज्येष्ठ व निष्णात वकील ऍड उज्वल निकम यांनी सोमवारी भेट घेतली तसेच घटनास्थळाची देखील पाहणी केली. व पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन . सांत्वन केले होते . यावेळी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार याप्रकरणाची सूत्रे ऍड उज्वल निकम यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे उज्वल निकम यांची तांबडी भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री आदिती तटकरे, पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते. तांबडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मानवतेला काळिमा फासणाऱ्या 26 जुलै रोजी घडलेल्या या घटनेने रायगडसह राज्यभरात संतापाची लाट उसळली. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मराठा समाजाच्या वतीने जोरदार मागणी केली होती.

याच मुद्यावर मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झाला होता. व राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यसरकाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून न्यायालयात खटला चालवण्याची जबाबदारी ऍड उज्वल निकम यांच्यावर सोपवली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.