Press "Enter" to skip to content

रिपाइं नेते जगदीश गायकवाड यांची राजभवनावर धडक : विविध मागण्यांचे राज्यपालांना निवेदन 

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी विविध प्रश्नांसाठी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.  व विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द करीत योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी विस्तृत चर्चेतून केली . यावेळी ओबीसी नेते राजाराम पाटील, सभापती विद्याताई गायकवाड, सुहास सूर्यवंशी आदी उपस्थीत होते. 

यावेळी जगदिश गायकवाड यांनी सिडकोच्या बेबंद शाहीचा पाढा वाचून सिडकोने कोंबडभुजे येथील पुरातन बौद्ध लेणी कशी नेस्तानाबूत केली याची इत्यंभूत माहिती राज्यपालांना सांगितली . तसेच पनवेल महानगरपालिकेचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी शासनास आदेश द्यावेत अशी मागणी केली.

तसेच पनवेल महानगरपालिकेचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी शासनास आदेश द्यावेत अशी मागणी केली. त्याचबरोबर उत्तरप्रदेश हाथरस येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना फाशी देण्यासाठी केंद्र सरकारला सुचना करावी असे निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले . जगदीशभाई गायकवाड व राजाराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली, राज्यपालांनी देखील यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर  निवेदनात नमूद केले आहे की  रायगड जिल्ह्याला ऐतिहासिक , शौर्य व  पराक्रमाची पाश्वभूमी आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ,  डॉ . बाबासाहेबांचा इतिहास , तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी तसेच , नरेंद्र महाराज , कान्होजी आंग्रे , नरवीर तानाजी मालुसरे , प्रभाकर पाटील , दि.बा. पाटील इत्यादींचा ऐतिहासिक वारसा या जिल्ह्याला लाभला आहे.

अशातच रायगड जिल्ह्यातील 2500 वर्षापूर्वीची बौद्ध लेणी , स्तूप हे सिडकोच्या मुजोरी मूळे लयास जात आहेत.  येथील बौद्ध लेण्या उध्वस्त करण्याचे षडयंत्र सूरु आहे. पुरातत्व खात्याची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी आमच्या अस्तित्वाला हात घातला आहे . याठिकाणी सिडकोने जे कृत्य केले आहे ते अत्यंत निंदनीय कृत्य आहे . आम्ही साऱ्या भारतातील बौध्दांच्या वतीने आपणास विनंती करतो की विमानतळ महत्वाचे आहे की बौध्दांची अस्मिता हे आपल्याच हातात आहे . आपण योग्य तो न्याय देऊन उपकृत कराल अशा प्रकारची अपेक्षा आपणाकडे व्यक्त करीत आहोत .

सिडकोला योग्यवेळी योग्य तो जाब विचारून इथल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या व त्यांच्या वाटेला आलेला १२.५ % भूखंडसुद्धा दिलेला नाही . एससी , एसटी , एनटी , ओबीसी , जातीच्या लोकांना रोजगार देणार नाही तोपर्यंत जीवीके व आदानी कंपनी यांना थारा देऊ नये , केरुमाता बौद्धलेणी ही वाघिवली वाडा , कोंबडभुजे , सर्वे नं . १ ९ ३ ओवळे , येथे आहे . त्यामुळे आपण या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी . जिथे लेणी होती तीचे संग्रहालय बांधुन जतन करावे व परदेशातुन भारतात येणाऱ्या अनुयायांना प्रार्थनिय स्थळी अवशेष ठेऊन नवी मुंबई , पनवेल , महाराष्ट्राचे व भारताचे नाव उंच करावे , अशी आमची धारणा आहे .

तसेच पनवेल महानगरपालिकेच्या आकृतीबंध सादर करुन जवळपास २ वर्षे झाली आहे व हा पनवेल महानगरपालिकेचा पहिलाच आकृतीबंध आहे . पनवेल महानगरपालिका दिनांक ०१ / ९ ० / २०१६ रोजी स्थापन झालेली असुन महानगरपालिकेचे परिक्षेत्र जवळपास ११० चौ.कि.मी. आहे . महानगरपालिकेचे कामकाज हे ३४ विभागात चालते . या विभागात फक्त ३१ ९ नगरपरिषदेचे कर्मचारी कार्यरत आहेत . कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्यामुळे महानगरपालिकेने जून २० ९ ८ मध्ये पदनिर्मितीकरिता आकृतीबंध शासनाला सादर केला आहे . ४ वर्षाचा कालावधी संपुष्टात येऊन देखोल कोणतोही पदनिर्मिती न झाल्यामुळे अत्यंत तोकडे मनुष्यबळ आहे . सद्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या मनुष्यबळामुळे जनतेला वैद्यकीय सोयी -सुविधा पुरविणे अशक्य होत आहे . पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेता तसेच महानगरपालिका हद्दीतील सफाई कामगार , पाणीपुरवठा , आरोग्य इत्यादी अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी कृपया महानगरपालिकेचा आकृतीबंध शासनाकडुन मंजूर होणे अत्यावश्यक आहे .

महानगरपालिकेची अडचण आणि जनतेच्या वाढत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिकेने सादर केलेल्या आकृतीबंधास त्वरित मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे . तसेच  उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केली . पिडित कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच स्थानिक पोलिस अधिकारी , उपचार करणारे डॉक्टर , जिल्हाधिकारी यांच्यावर कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी या निवेदनाद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.