Press "Enter" to skip to content

वाहतूक सुरू असतानाच कोसळला उड्डाणपुलाचा भाग

पहा डॅशिंग आमदार नितेश राणेंचे रौद्ररूप या व्हिडिओत

सिटी बेल लाइव्ह / कणकवली #

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात बांधण्यात आलेल्या कणकवलीतील नव्या फ्लायओव्हरचा मोठा भाग वाहतुक सुरू असतानाचं कोसळला. हा भाग कोसळताना तिथून जाणारे दोन वाहनचालक सुदैवाने बचावले त्यामुळे जिवितहानी टळली. मात्र या पुलाचं बांधकामच सदोष असल्यामुळे या नव्या पुलाला जागोजागी आधार देण्यात आले आहेत. हे आधार दिले असले तरी हा पूल केव्हाही कोसळून गंभीर दुर्घटना होण्याची भीती आहे. एकूणच या घटनेमुळे हायवे बांधकामातला भ्रष्टाचार उघड्यावर आला आहे.

पूल कोसळताच आमदार नितेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांना दिला इशारा दिला आहे. पूलाचा मोठा भाग कोसळल्याचे लक्षात येताच कणकवलीकर नागरिकानी हायवेवर धाव घेतली आणि वाहनचालकाना सतर्क करीत वाहतूक तातडीने बंद केली .

वारंवार या निकृष्ट दर्जाबाबत सांगूनही हायवे ठेकेदार जुमानत कसा नाही याबद्दल कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्यावर आमदार राणे चांगलेच भडकले. आताच्या आता हा धोकादायक पूल कोसळून टाका आणि नागरिकांच्या जिवाशी खेळू नका असे राणे म्हणाले तसेच जोपर्यंत स्ट्रकचरल ऑडिट होउन पूल सुरक्षित असल्याचे हायवे विभागाकडून लेखी दिले जाणार नाही तोपर्यंत सिंधुदुर्गातल्या हायवेवरुन एकही वाहन जाउ देणार नसल्याचा इशाराही भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

हायवेच्या निकृष्ट बांधकामामुळे जागोजागी पूरपरिस्थिती सिंधुदुर्गातील हायवेच्या कामाचा ठेका मध्यप्रदेशच्या दिलीप बिल्डकॉन कंपनीकडे देण्यात आलेला आहे. परंतू कोकणातल्या पावसाचा विचार करता या हायवेचे काम अनेक ठिकाणी इतके सदोष झालेले आहे की यावर्षी पाउस सुरु झाल्यापासून हायवेलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत आहे.हायवेसाठी टाकण्यात आलेल्या भरावामुळे पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून हे पाणी गावात शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच या नव्या हायवेवरही अनेक ठिकाणी पाणी तुंबत असल्यामुळे वेगात असणाऱ्या वाहनचालकांचे गंभीर अपघात होत आहेत. या सगळ्या घटनामुळे सिंधुदुर्गातील नागरिक प्रचंड संतापले असून येत्या गणेश चतुर्थीच्या आधी हायवे सुस्थितीत झाला नाही तर हायवेचे अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात नागरिकांचा तीव्र उद्रेक होण्याची शक्यता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.