Press "Enter" to skip to content

“पिंच्याक सिल्याट” खेळासाठी शासनाने नोकरीत ५ टक्के आरक्षण ठेवावे

क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन सादर 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷

” पिंच्याक सिल्याट ” या खेळाचा महाराष्ट्र शासनाने सरकारी नोकरीच्या भरतीमध्ये “पिंच्याक सिल्याट” खेळासाठी ५ टक्के राखीव आरक्षणाचा समावेश करण्याबाबत महाराष्ट्र “पिंच्याक सिल्याट” असोसिएशनच्या वतीने क्रिडा व युवक कल्याण, उद्योग, खनिकर्म, पर्यटन व फलोत्पादन राज्यमंत्री व रायगडच्या पालक मंत्री ना. आदितीताई तटकरे यांना नुकतेच एक निवेदन देऊन त्यांना साकडे घालण्यात आले.

"पिंच्याक सिल्याट" हा खेळ इंडीनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असून या खेळाला " युवक कल्याण "आणि " क्रीडा मंत्रालय " भारत सरकार व " भारतीय विश्वविद्यालय संघ " " ऑलम्पिक कांऊसिल ऑफ एशियाची " मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय यांच्या अधिकृत " राष्ट्रीय " व " आंतरराष्ट्रीय " स्पर्धांमध्ये खेळला जातो हा खेळ स्वसंरक्षसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी युवक, युवती व महिलांमध्ये देशभरात प्रसिद्ध होत आहे.

मागील ७ वर्षांपासून " महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट " हा संघ राष्ट्रीय पातळीवर अव्वल असून त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत " पिंच्याक सिल्याट " खेळ खेळणारे महाराष्ट्र राज्यात हजारो गुणवंत खेळाडू असून एशियन गेम, बिच गेम व ऑलम्पिक गेम स्पर्धात ते उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पदके राज्याला मिळवून देऊ शकतात. केंद्र शासनाने नुकत्याच शिफारस केलेल्या खेळांच्या यादीमध्ये १ सप्टेंबर, २०२० पासून या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी ५ टक्के राखीव नोकर भरती मध्ये केला आहे.

केंद्र शासनप्रमाणे राज्यशासनाने या खेळाचा ५ टक्के नोकर भरती मध्ये समावेश करून महाराष्ट्रातील या खेळात खेळणाऱ्या हजारो खेळाडूंना नोकर भरतीत न्याय द्यावा अशी विनंतीही महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे पदाधिका-यांनी आपल्या निवेदनाद्वारे ना. आदितीताई तटकरे यांना केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.