Press "Enter" to skip to content

मनसेने ज्वेलर्सला थोबाडले,मराठीत माफी मागणेस भाग पाडले !

मराठीत बोलण्याची मागणी केल्याने लेखिकेला महावीर ज्वेलर्सने दुकानाबाहेर ढकलून दिले…लेखिकेचे ठिय्या आंदोलन 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । अजय शिवकर । 💠🌟💠

कुलाब्यात राहणाऱ्या लेखिकेने सराफा दुकानदाराला मराठीत बोलण्याची मागणी केल्याने लेखिकेला दुकानदाराने अपमानित करीत बाहेर ढकलून दिल्याने अपमानित झालेल्या लेखिकेने गुरुवारी (8 ऑक्टोबर) दुपारपासून दुकानाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले.

शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव असून मराठीत बोलण्याची मागणी केल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक देत दुकानाबाहेर ढकलून दिल्याचा आरोप या लेखिकेने केला आहे.काल दुपारी त्या कुलाब्यातील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या.

दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत होते. त्यांनी मराठीत बोलावे अशी त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच मात्र देशपांडे यांना दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाच्या बाहेर ढकलून काढले.
यामुळे दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केल्याचा आरोप करत त्या काल दुपारपासून या दुकानासमोरील रस्त्यावर ठिय्या देऊन बसल्या. जोपर्यंत त्या सराफ आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण इथेच ठिय्या देऊन झोपून राहणार असल्याची भूमिका देशपांडे यांनी घेतली .

शोभा देशपांडे यांनी ‘थरारक सत्य इतिहास’ आणि ‘इंग्रजी इंडिया हाच आपला खरा शत्रू’ या दोन पुस्तकांचं संकलन केलं असून एक वृत्तपत्र देखील त्या चालवत होत्या. त्यांचे पती भारतीय नौदलात होते. शोभा देशपांडे गेले अनेक वर्षे मराठी भाषेसाठी लढा देत आहेत. महाराष्ट्रची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषेचा अपमान होत असल्याने त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरु केले. मनसेच्या संदिप देशपांडे व मनसैनिकांनी आज सकाळी महावीर ज्वेलर्सला याबाबत जाब विचारुन थोबाडले तसेच मराठीत माफी मागणेस भाग पडले.

शोभा देशपांडे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने हाँस्पिटलला दाखल केले असून,त्यांचेवर उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद

सराफ व्यापाराने मागितली माफी, शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे याना त्यांच्या घरी सोडले, शोभा देशपांडे यानी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना स्मरल्या मातोश्रीच्या आठवणी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.