Press "Enter" to skip to content

मराठा संघर्षं समितीच्या अनेक मागण्या मान्य : महाराष्ट्र बंद तुर्तांस मागे

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । राकेश खराडे । 🔶🔷🔶

एक मराठा लाख मराठाचे वादळ घोंगावत संपुर्ण राज्यभरातील मराठा समाज एकत्र येवून आपल्या न्यायहक्कासाठी येत्या दहा ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद चा निर्णय घेतला होता. परंतु मराठा संघर्ष समितीच्या अनेक मागण्या मान्य झाल्याने महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आल्याचे मराठा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांचे समर्थक दिपक पाटील अध्यक्ष कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्रराज्य यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मराठा संघर्ष समितीशी झालेल्या चर्चेमध्ये काही प्रमुख मागण्या मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्यामुळे दहा तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंदची घोषणा तूर्तास मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासंदर्भात दि.8 रोजी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेण्यात आली.

या बैठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब,विजय वडेट्टीवार उपस्थित होते.या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने दहा तारखेचा बंद मागे घेण्यात आल्याचे सुरेशदादा पाटील यांनी सांगितले.यासाठी कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या सर्व समर्थकांनी या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला मध्ये सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला होता.

मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी इथून पुढे मराठा संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण सर्वजण नेहमी कार्यरत राहू आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत हा लढा कायम तेवत ठेवू. यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आठ ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीत मराठा संघर्ष समितीच्या काही मागण्या मान्य केल्याने महाराष्ट्र बंद’ची घोषणा तुर्तास मागे घेण्यात आली आहे.

यावेळी बैठकीमध्ये पुढील मागण्या मान्य करण्यात आल्या

🌟 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विकास महामंडळासाठी 400 कोटी
🌟 सारथी साठी 130 कोटी
🌟 शैक्षणिक शुल्क फिसाठी 600 कोटी
🌟 मराठा महासंघाच्या मोर्चातील दाखल केलेले गुन्हे मागे घेणार
🌟 मराठा क्रांती मोर्चांत बलिदान दिलेल्या मुलांच्या कुटूंबातील एकाला नोकरी
🌟 मराठा आरक्षणाच्या बाबत वकील लावून आम्ही आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार,स्टे उठवून देणार
🌟 ईडब्ल्युएस आरक्षण आणि नोकरभरती साठी एक महिन्याची मागणी मान्य
🌟 एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत आदी. मागण्या मान्य करण्यात आल्या. याबाबत मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांचे कट्टर समर्थक दिपकदादा पाटील यांनी सरकारचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.